Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News: विनानंबरच्या दुचाकीवरून येत रोडरोमिओंकडून छेडछाड; अंबाजोगाईतील धक्‍कादायक घटना

विनानंबरच्या दुचाकीवरून येत रोडरोमिओंकडून छेडछाड; अंबाजोगाईतील धक्‍कादायक घटना

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील शिक्षणाचे पंढरी समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाईत (Ambajogai) तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड काढण्यात आली. याबाबत मुलीच्‍या (Police) तक्रारीवरून गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

अंबाजोगाई तालुक्यातील १७ वर्षीय पिडीता ही शिक्षणासाठी अंबाजोगाई शहरात राहते. यादरम्यान शहरातील नावाजलेल्या परिसरात दोन रोडरोमियोंनी पिडीतेचा विना नंबरच्या मोटारसायकलवर बसून पाठलाग केला. हॉर्न वाजवून तिची छेडछाड केली. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात आकाश नागोराव डोंगरे (वय २१) आणि वैभव नामदेव चाटे (वय २१) या दोघांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान यामुळे पुन्हा एकदा शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाई महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अंबाजोगाईत शिक्षणासाठी येत असणाऱ्या मुली असुरक्षित तर नाहीत ना? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : राहुल गांधींसह इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

बदलापूरमध्ये पाणी संकट; आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, तुमच्या सोसायटीत कधी असणार पाणी बंद?

काँग्रेसचा अनुभवी चेहरा काळाच्या पडद्याआड, राहुल गांधींनी केले दु:ख व्यक्त; राजकारणात हळहळ

Kitchen Hacks : पाण्याने खरंच ओळखता येतं का नकली पनीर? जाणून घ्या पद्धत

Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT