बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर–हातोला रस्त्यावर शनिवारी रात्री भीषण अपघात घडला. दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी आहे. तसेच दोन्ही दुचाकींचा चक्काचुर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदतकार्याला सुरूवात केली. यासह पोलिसांनाही याची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपासाला सुरूवात केली आहे.
अभय सतीश चव्हाण या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, रहिमखान पठाण आणि नासीर खाजामियाँ शेख हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, दोघांनी वाटेतच प्राण सोडले. दरम्यान, या अपघातात ऋषिकेश अशोक चव्हाण हा तरूण गंभीर असल्याची माहिती आहे. त्याच्यावर सध्या अंबाजोगाईतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
लिमगाव पाटीजवळ हा भीषण अपघात घडल्याची माहिती आहे. शनिवारी रात्री दोन्ही भरधाव दुचाकी रस्त्यावरून जात होती. दरम्यान, दोन्ही दुचाकींचा अपघात घडला. या अपघातात दुचाकीचे देखील नुकसान झाले. दुचाकीचा चक्काचूर झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी याची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले.
पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? याचा तपास सुरू आहे. दरम्यान, दोन दुचाकींच्या भीषण अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच अपघाती मृत पावलेल्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.