Beed Accident News Saam tv
महाराष्ट्र

Beed Accident News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना अज्ञात वाहनांची धडक; एकाच जागीच मृत्यू

Beed News: मॉर्निंग वॉकिंगला गेलेल्या दोघांना अज्ञात वाहनांची धडक; एकाच जागीच मृत्यू

विनोद जिरे

बीड : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना अज्ञात पिकअपने जोरदार धडक दिली. या (Accident) धडकेत १ आडत व्यापारी जागीच ठार झाला आहे. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. (Live Marathi News)

सदर घटना बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या गेवराई- शेवगाव या महामार्गावरील उमापूर गाव परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. गोपाल राऊत असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. गोपाळ राऊत व त्यांच्या सोबत मनोज पत्नी हे दोघे नेहमीप्रमाणे आज पहाटे मॉर्निग वॉक करायला गेले होते. या दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने त्यांना धडक देत उडविले. यामुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. 

या अपघातात गोपाळ राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे सहकारी मनोज पाटनी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ संभाजीनगरला हलवले आहे. याप्रकरणी बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात, अज्ञात वाहनधारका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT