Beed Dr Valmik Mundhe  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Accident News : बीड -परळी महामार्गावर भीषण अपघात, पुलाच्या अर्धवट कामाने घेतला डॉक्टरचा बळी

Beed Accident News : डॉ. वाल्मीक मुंडे असे अपघातात जागीच ठार झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. तर डॉ. प्रवीण खाडे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विनोद जिरे

Beed News :

बीड - परळी महामार्गावरील जिरेवाडीजवळ गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गावरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. पुलाच्या याच अर्धवट कामामुळे परळी येथील डॉक्टरचा अपघातात बळी गेला आहे.

डॉ. वाल्मीक मुंडे असे अपघातात जागीच ठार झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. तर डॉ. प्रवीण खाडे हे जखमी झाले आहेत. जखमी डॉ. खाडे यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परळीच्या जिरेवाडी बायपास रोडवर गावालगत एका ठिकाणी नाल्यावर पुलाचे काम सुरू आहे. मात्र या ठिकाणी प्रगतीपथावरील कामाचा कोणताही दिशादर्शक बोर्ड लावलेला नाही. तसेच नाला काम अर्धवट असल्याने रस्त्यात पाईप पडलेले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यामुळे वाहन चालवताना अनेक वाहन चालकांना अडचणी येत आहेत. याच रस्त्यावरून डॉ. प्रवीण खाडे व डॉ.वाल्मीक मुंडे हे दोघेजण कारने परळीहून जिरेवाडीकडे येत होते. यादरम्यान नादुरुस्त रस्त्याच्या अंदाज न आल्याने त्यांची कार रस्त्यावर पडलेल्या पाईपला धडकुन खाली खड्ड्यात कोसळली.

या अपघातात डॉ. वाल्मीक मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. प्रविण खाडे हे जखमी झाले आहेत. दरम्यान अत्यंत कमी दरात रुग्णसेवा करणारे डॉक्टर असा वाल्मीक मुंडे याचा नावलौकिक होता. त्यांच्या मृत्यूने तालुक्यातील गरीब रुग्णांसाठीचा आरोग्यदूत हरवल्याच्या भावना व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

SCROLL FOR NEXT