Beed Accident Saam tv
महाराष्ट्र

Beed Accident : चारचाकीची दुचाकी, बैलगाडीला धडक; एकाचा मृत्यू, ३ जण जखमी; बैलांचेही मोडले पाय

Beed News : तेलगावकडून माजलगावकडे जाणाऱ्या बैलगाडी आणि दुचाकीला एका भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

विनोद जिरे

बीड : बीडच्या माजलगाव- तेलगाव महामार्गावरील नित्रुड येथे आज दुपारच्या सुमारास तिहेरी अपघात झाला. या विचित्र अपघातात एका जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीत एक तीन वर्षाचा मुलगा व दोन महिलांचा समावेश आहे. 

तेलगावकडून माजलगावकडे जाणाऱ्या बैलगाडी आणि दुचाकीला एका भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा भीषण (Accident) अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील रतन कांबळे (वय ४५) हे फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेल्या (Beed) मनीषा सुरेश वाघमारे (वय ४०) व लक्ष्मी लखन कदम (वय ३०) व कार्तिक लखन कदम (वय ३) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

महामार्गावर चारचाकी गाडीने दुचाकीसह समोरून येणाऱ्या बैलगाडीला (Bullock Cart) देखील जोरदार धडक दिली. बैलगाडीला धडक बसल्याने दोन्ही बैलाचे पाय मोडले आहेत. दरम्यान याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT