Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : तुम्ही डुक्कर मारायचं काम मन लावून करा; भीमराव धोंडे यांचा सुरेश धसांना अजब सल्ला

Beed News : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. सर्च मतदारसंघात हा प्रचार होत असून वेगवेगळ्या कारणांनी हा प्रचार चर्चेत येत आहे.

विनोद जिरे

बीड : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रचारा दरम्यानच्या होत असलेल्या जाहीर सभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र बीडच्या आष्टी मतदार संघातील प्रचारात वेगळाच रंग भारत असून या प्रचारात डुक्कर मारण्याची अजब चर्चा सुरू आहे. 

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. सर्च मतदारसंघात हा प्रचार होत असून वेगवेगळ्या कारणांनी हा प्रचार चर्चेत येत आहे. त्यानुसार (Beed) बीडच्या आष्टीमध्ये वेगळ्याच कारणाने हा प्रचाराची चर्चा रंगत आहे. मला निवडून द्या, मी निवडून आल्यावर तालुक्यातील सर्व डुक्कर मारतो, असं अजब आश्वासन देणाऱ्या सुरेश धस (Suresh Dhas) यांना आता बंडखोर उमेदवार भीमराव धोंडे यांनी अनोखा सल्ला दिला आहे. तुम्ही आता डुक्कर मारायचं काम मन लावून करा, इथ आता शिट्टीच वाजणार; असं म्हणत धोंडे यांनी अजब आश्वासन देणाऱ्या धसांना अजब सल्ला दिला आहे. 

आज भीमराव दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा फोटो हातामध्ये घेऊन पाटोदा शहरात जंगी अशी रॅली काढली होती. यावेळी त्यांनी शक्ती प्रदर्शन करत मतदारांना आवाहन देखील केल आहे. दरम्यान जसे पोलीस शिट्टी वाजवून चोरांना पळवतात, तसच आपण आता आपल्या मतदारसंघातील चोरांना पळवण्यासाठी शिट्टी वाजवणार आहोत आणि शिट्टी वाजवा; असं म्हणत त्यांनी मतदारांना आवाहन केलं. तसेच सुरेश धस यांना देखील डुक्कर मारण्याचा अजब सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

Pawar vs Pawar: पवार कधीच एक होणार नाहीत? वैयक्तिक नव्हे वैचारिक मतभेद: शरद पवार

Horoscope: काही राशींना लागेल लॉटरी तर काहींची होईल खटपट; जाणून घ्या कसा असेल शुक्रवारचा दिवस

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

SCROLL FOR NEXT