सावधान! Corona वाढतोय; नगरमधील २७ गावात टाळेबंदी! Saam Tv
महाराष्ट्र

सावधान! Corona वाढतोय; नगरमधील २७ गावात टाळेबंदी!

आज संगमनेर शहरातील ११ जणांसह तालुक्यातील 155 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येने आता एकूण 33 हजार रुग्णांचा टप्पा गाठला आहे.

गोविंद साळुंके

अहमदनगर : संगमनेर तालुक्यासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. त्यामुळे तिसरी लाट येऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून प्रशासनाने संगमनेर तालुक्यातील दहा पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असलेल्या गावात लॉकडाऊन करण्यास सुरुवात केली आहे.

हे देखील पहा :

अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 27 गावे 5 ऑक्टोंबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने खळी, पिंप्री, लौकि, जाखुरी, पानोडी, मणोली, घुलेवाडी या गावांसह एकूण 27 गावे प्रशासनाने बंद केली आहेत. जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांमध्ये कोविड संक्रमणाची गती खाली येऊ लागली आहे. मात्र, चिंतेची बाब, म्हणजे संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत आहे.

आज शहरासह तालुक्याच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याने तालुका आरोग्य व्यवस्थेची चिंता दुप्पट झाली आहे. एकीकडे वरीष्ठ पातळ्यांवरुन आदेशामागून आदेशाची रिघ लागलेली असताना दुसरीकडे त्याची अंमलबजावणीच होत नसल्याने तालुका पुन्हा एकदा कोविडच्या सावटाखाली आला आहे. रुग्णवाढ गेली तीन दिवस खालावलेली होती. आज मात्र पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज संगमनेर शहरातील ११ जणांसह तालुक्यातील 155 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येने आता एकूण 33 हजार रुग्णांचा टप्पा गाठला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nurses Strike : आरोग्य यंत्रणा ठप्प होणार? नर्सचा संपाचा इशारा | VIDEO

Ambarnath : भरधाव स्कुल व्हॅनमधून विद्यार्थी पडले खाली; अंबरनाथमधील धक्कादायक घटना, घटना सीसीटीव्हीत कैद

'भोजपुरीमध्ये बोलून दाखव...' उत्तर प्रदेशमध्ये मराठी तरुणाला दमदाटी|VIDEO

Maharashtra Live News Update : बांबूच्या जोडीतून गर्भवती महिलेची सात किलोमीटरची पायपीट....

Dnyanda Ramtirthkar: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT