basmba villagers rasta roko andolan on hingoli washim national highway. saam tv
महाराष्ट्र

Hingoli: रखरखत्या उन्हात ग्रामस्थांचा हिंगोली- वाशीम महामार्गावर ठिय्या

घटनास्थळी हिंगोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात आहे.

संदीप नांगरे

हिंगोली : उड्डाणपुल करावा या मागणीसाठी गेल्या दाेन तासांपासून ग्रामस्थांनी (villagers) हिंगोली वाशीम राष्ट्रीय महामार्ग (hingoli washim national highway) राेखून (rasta roko andolan) धरला आहे. यामुळे या महामार्गावरील एका बाजूची वाहतुक पुर्णपणे खाेळंबली आहे. (hingoli washim national highway latest marathi news)

हिंगोली वाशीम राष्ट्रीय महामार्गावरील बासंबा गावच्या पाटी जवळ पुल नसल्याने दररोज अपघाताच्या घटना घडून नागरिकांचे बळी जाताहेत. त्यामुळे येथे पुल हाेणे गरजेचे आहे. या परिसरातील वीस ते पंचवीस गावातील हजारो नागरिक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास गेल्या काही महिन्यांपासून पुलाची मागणी करीत आहेत.

या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने आज संतप्त गावकऱ्यांनी गेल्या दोन तासांपासून महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी गावकऱ्यांना ठोस आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही अशी भुमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. घटनास्थळी हिंगोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT