Sanjay Raut SAAM TV
महाराष्ट्र

Sanjay Raut : 'ते' ट्विट संजय राऊतांना भोवलं, बार्शीत गुन्हा दाखल (पाहा व्हिडिओ)

यावर संजय राऊत काय बाेलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

विश्वभूषण लिमये

Sanjay Raut Tweet : खासदार संजय राऊत (sanjay raut latest marathi update) यांनी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत न्याय मिळावा यासाठी ट्विटरवर (sanjay raut tweets minor girl photo) छायाचित्रासह पाेस्ट केली. त्याबाबत नेटीझन्सनी मुलीची ओळख जाहीर हाेत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान राऊतांवर बार्शी शहर पाेलिस ठाण्यात (Barshi City Police Station) गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समाेर येत आहे. (Breaking Marathi News)

खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी टॅग करुन देवेंद्रजी... हे चित्र बार्शीतले आहे.. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे.

अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ? ५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत असे ट्विटमध्ये नमूद केले आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे मात्र हे ट्विट त्यांना भाेवलं आहे.

या ट्विटला काही नेटीझन्सनी तेथेच उत्तर देत मुलींची ओळख हि गुप्त ठेवायची असते. त्यामुळे रिपोर्ट करा सगळ्यांनी असे म्हटलं. दरम्यान आज बार्शी शहर पाेलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनूसार संजय राऊत यांच्या ट्विटवरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

राऊत यांनी अल्पवयिन पीडितीची ओळख जाहीर केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड कलम 41 (ब) अंतर्गत त्यांना नोटीस दिली जाईल अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

होर्मुजमधल्या केबल्सवरुन इराणचा इशारा, तेलाच्या आगीत इंटरनेटची ठिणगी?

Maharashtra News Live Update: सागर नाईक यांनी भर सभेत महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना सुनावले खडेबोल

ट्रम्प यांनी ओकली भारताविरोधात गरळ, ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

SCROLL FOR NEXT