Dharashiv ST Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv ST Bus Accident: बार्शीवरून धाराशीवकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू

ST Bus Accident in Dharashiv: सोलापूरच्या बार्शीतून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. बार्शीवरून धाराशिवकडे जाणाऱ्या एसटी बसच्या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur St Bus Accident News:

सोलापूरच्या बार्शीतून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. बार्शीवरून धाराशिवकडे जाणाऱ्या एसटी बसच्या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर एसटी बस रस्त्याच्या कडेला कलंडली. बार्शी-धाराशिव महामार्गांवर हा अपघात झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी-धाराशीव महामार्गांवर विचित्र अपघात झाला असून या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत.बार्शीहून धाराशिवकडे जाणाऱ्या एसटी बस आणि दुचाकी मोटारसायकलमध्ये हा अपघात झाला आहे. एसटी बस देखील रस्त्याच्या कडेला एका बाजूला कलंडली. या अपघातात एसटी बसमधील प्रवासी देखील जखमी झाले आहेत.

अपघात नेमक कुठे झाला?

बार्शी - धाराशीव महामार्गावरील तांदुळवाडी जवळील सुयेश विद्यालया नजीक हा विचित्र अपघात झाला आहे. बार्शीहुन धाराशीवकडे जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाला आहे. या अपघातात आणखी किती जणांचा मृत्यू झालाय, हे अधिकृतरित्या समजू शकले नाही.

पूर्णा-शिंगणापूर महामार्गावर अपघात

पूर्णा शिंगणापूर या राष्ट्रीय महामार्गावर अपघात सत्र सुरुच आहे. याच रस्त्यावर आज गुरुवारी टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये दोघे जण गंभीरित्या जखमी झाले आहे. टेम्पोमधील एक जण किरकोळ जखमी झाला आहे.

अपघातामधील जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. या महामार्गावर किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता वाहन चालकांकडून होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

Horoscope: करिअरमध्ये प्रगती साधाल; यश, उन्नतीचे नवीन मार्ग मिळतील

Top 7 Mileage Bikes 2026: भारतात या टू व्हिलर देतात सर्वाधिक मायलेज; लिस्टमध्ये अनेक बाईक्सचा समावेश

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

SCROLL FOR NEXT