Baramati rahuri bypolls election results  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Baramati rahuri bypolls election results: सुनेत्रा पवार बारामतीमधून विजयी, अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी स्वीकारले प्रमाणपत्र

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : बारामती, राहुरीच्या पोटनिवडणुकीचा निकाल, विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज, महाराष्ट्रात उष्णतेची लाट, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

सुनेत्रा पवार बारामतीमधून विजयी, अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी स्वीकारले प्रमाणपत्र

अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी स्वीकारले प्रमाणपत्र

सुनेत्रा पवार मुंबईत असल्याने किरण गुजर यांनी स्वीकारले प्रमाणपत्र

२ लाख १८ हजार मतांच्या आघाडी ने सुनेत्रा पवार बारामतीतून विजयी

पाचपैकी तीन राज्यात विजय झाल्यानंतर धुळ्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत साजरा केला भाजपचा विजयाचा जल्लोष

भाजप पक्ष श्रेष्ठींच्या प्रयत्नांमुळेच तीन राज्यांमध्ये भाजपची एक हाती सत्ता आमदार आरोप अग्रवाल यांनी पक्षश्रेष्ठींच्या प्रयत्नांना यश आले असल्याची व्यक्त केली भावना

बारामती पोटनिवडणुकीत ७७३जणांनी "नोटा" दिलं मतं

सुनेत्रा पवारानंतर बारामतीत दुसऱ्या क्रमांकावर आर वाय घुटूकडे, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या उमेदवाराला ९३१ मतं

बारामती मधील मतमोजणीत "नोटा" ला ७७३ मतं

बारामती मध्ये पार पडलेल्या मतमोजणीत एकूण २४ फेऱ्या

पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन

नसरापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात ABVP च आंदोलन

पुण्यातील गुडलक चौकात विद्यार्थ्यांनी केल आंदोलन

पुण्यातील गुडलक चौकात विद्यार्थ्यांकडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न

चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी करत आंदोलन

पुण्यात गाड्या तोडफोड सत्र सुरूच विश्रांतवाडी परिसरातील धानोरी भागात कोयता गँगने केली गाड्यांची तोडफोड

विश्रांतवाडी येथील धानोरी भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ‘कोयता गॅंग’ सक्रिय असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी हातात कोयते घेऊन फिरत काही अज्ञात तरुणांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात येत आहे.यामध्ये एका स्कॉर्पिओ वाहनाची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली असून संबंधित वाहनमालकाने विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात कळंबमध्ये भव्य मोर्चा

धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आज भव्य मोर्चा काढण्यात आला. हजारो भीम अनुयायांनी भर उन्हात सहभाग घेत एक किलोमीटरहून अधिक अंतर पार करत तहसील कार्यालयावर धडक दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत तहसीलवर पोहोचला.यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत,मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

लातूर जिल्ह्यात सर्वत्र पेट्रोल डिझेलचा तुटवडा, अनेक पेट्रोल पंप बंद

लातूर जिल्ह्यात कालपासून सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा पाहायला मिळतोय, जिल्ह्यातल्या अनेक पेट्रोल पंपावर नागरिक तासनतास रांगा लावून उभे आहेत, पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद झाले आहेत, इंधनाच्या तुटवड्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे

गोकुळ दूध संघावर प्रशासकांची नियुक्ती

गोकुळ दूध संघावर प्रशासकांची नियुक्ती

विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार हा मोठा निर्णय

५ सदस्यीय प्रशासकीय अधिकारी मंडळ नेमलं

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत आदेश जारी करत गोकुळच्या कारभारासाठी ५ जणांचे प्रशासकीय मंडळ नियुक्त

कोण आहेत प्रशासक?

अध्यक्ष : संजयकुमार सुतार

प्रदीप मालवडे

सुनील धायगुडे

सागर बलकवडे

चंद्रकांत पल्लेकर

Baramati bypolls election results: सुनेत्रा पवार यांचा विजयानंतर जय पवार दादांच्या स्मृतिस्थळावर

बारामती -

सुनेत्रा पवार यांचा विजयानंतर जय पवार दादांच्या स्मृतिस्थळावर

सुनेत्रा पवार ठरल्या देशातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या आमदार

विजय जाहीर होताच जय पवार यांनी घेतलं दादांचे दर्शन

जय पवार यांनी फुलं वाहून केलं दादांना अभिवादन

Baramati bypolls election results: 23व्या फेरी अखेरीस सुनेत्रा पवार यांना २ लाख १४ हजार ५९ मतांची आघाडी

बारामती ब्रेकिंग

तेविसाव्या फेरी अखेरीस सुनेत्रा पवार यांना २ लाख १४ हजार ५९ मतांची आघाडी

तेविसाव्या फेरीमध्ये सुनेत्रा पवार यांना ११०५६ मतं

Baramati bypolls election results:  21 व्या फेरी नंतर सुनेत्रा पवार यांना १ लाख ८९ हजार ६५७ मतांची आघाडी

बारामती -

एकविसाव्या फेरी नंतर सुनेत्रा पवार यांना १ लाख ८९ हजार ६५७ मतांची आघाडी

एकविसाव्या फेरी मध्ये सुनेत्रा पवार यांना १ लाख ३७ मतं

Baramati bypolls election results: सुनेत्रा पवार यांच्या नावाने बारामतीमध्ये नवा विक्रम

बारामती -

सुनेत्रा पवार यांच्या नावाने बारामतीमध्ये नवा विक्रम

२०१९ मधील अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला

सुनेत्रा पवार यांना १९ व्या फेरी मध्ये १ लाख ६८ हजार मतांची आघाडी

२०१९ मध्ये अजित दादांना एकूण १ लाख ६५ हजारांचे होते मताधिक्य

बारामती पोटनिवडणुकीच्या एकूण २४ फेरींपैकी १९ फेऱ्यांचे निकाल समोर

Baramati bypolls election results: 19 व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना 1 लाख ६८ हजार ५५५ मतांची आघाडी

बारामती -

एकोणिसाव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना 1 लाख ६८ हजार ५५५ मतांची आघाडी

१९व्या फेरी मध्ये सुनेत्रा पवार यांना ९४८९ मतं

Baramati bypolls election results: 18 व्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना १ लाख ५९ हजार ६६ मतांची आघाडी

बारामती -

अठराव्या फेरीनंतर सुमित्रा पवार यांना १ लाख ५९ हजार ६६ मतांची आघाडी

अठराव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना ८१९० मतं

rahuri bypolls election results: 17 व्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना 69 हजार 997 मतांची आघाडी

राहुरी विधानसभा -

17 व्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना 69 हजार 997 मतांची आघाडी..

rahuri bypolls election results: 14 व्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना 58 हजार 197 मतांची आघाडी

राहुरी विधानसभा -

14 व्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना 58 हजार 197 मतांची आघाडी..

Baramati bypolls election results: पंधराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना १ लाख ३२ हजार ९१६ चे मताधिक्य

बारामती -

पंधराव्या फेरी नंतर सुनेत्रा पवार यांना १ लाख ३२ हजार ९१६ चे मताधिक्य

पंधराव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना एकूण ११ हजार ६१ मतं

Baramati bypolls election results: चौदाव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना १ लाख २१ हजार ८५५ मतांची आघाडी

बारामती -

चौदाव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना १ लाख २१ हजार ८५५ मतांची आघाडी

चौदाव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना ९ हजार ५८७ मतं

Baramati bypolls election results: तेराव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना १ लाख १२ हजार २६८

बारामती ब्रेकिंग

तेराव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना १ लाख १२ हजार २६८

तेराव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना ८५६९ मतं

सुनेत्रा पवार यांनी मोडला अजित दादांचा २०२४ मधील विक्रम

२०२४ मध्ये अजित पवारांचा १ लाख १ हजारांनी झाला होता विजय

rahuri bypolls election results: 12 व्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डिले 50 हजार 273 मतांनी आघाडीवर

राहुरी विधानसभा -

12 व्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डिले 50 हजार 273 मतांनी आघाडीवर..

Baramati bypolls election results: सुनेत्रा पवार यांनी ओलांडला १ लाख मतांचा टप्पा

बारामती -

सुनेत्रा पवार यांनी ओलांडला १ लाख मतांचा टप्पा

बाराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना १ लाख ३ हजार ७०९ मतांची आघाडी

बाराव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना ८०५७ मतं

बाराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित

Baramati bypolls election results: अकराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना ९५ हजार ६५२ मतांची आघाडी

बारामती -

अकराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना ९५ हजार ६५२ मतांची आघाडी

rahuri bypolls election results: भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांची विजयाकडे वाटचाल

राहुरी विधानसभा -

भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांची विजयाकडे वाटचाल

आतापर्यंतच्या सर्व फेऱ्यांमध्ये निर्णायक आघाडी...

कर्डिले यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी...

मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांडून विजयी जल्लोष...

कार्यकर्त्यांडून जोरदार घोषणाबाजी...

 Baramati bypolls election results: दहाव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना ८७ हजार ७२८ मतांची आघाडी

बारामती -

दहाव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना ८७ हजार ७२८ मतांची आघाडी

 Baramati bypolls election results: बारामतीमध्ये विजयी मिरवणुका निघणार नाहीत

बारामती -

बारामती मध्ये विजयी मिरवणुका निघणार नाहीत

कार्यकर्त्यांकडून होणार सुनेत्रा पवार यांच्या आवाहनाचे पालन

बारामती मध्ये गुलालाची उधळण सुद्धा कार्यकर्त्यांकडून होणार नाही

काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केलं होतं आवाहन

rahuri bypolls election results: आठव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डिले 33 हजार 222 मतांनी आघाडीवर

राहुरी विधानसभा -

आठव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डिले 33 हजार 222 मतांनी आघाडीवर..

 Baramati bypolls election results: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 97 टक्के मते मिळतील - रोहित पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 97 टक्के मते मिळतील

मतदाना दिवशी आणखी दहा टक्के मतदान झाले असते तर सुनेत्रा काकींनी देशातील सर्वाधिक मताधिक्याचे आजवरचे सर्व विक्रम मोडले असते

आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला विश्वास

rahuri bypolls election results: सातव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 29657 मतांनी आघाडीवर

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक -

सातवी फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 35076

राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 5401

वंचित संतोष चोळके- 2859

अपक्ष रावसाहेब खेवरे- 2343

rahuri bypolls election results: मतदारांचा विश्वास आणि भाजपच्या नेत्यांमुळे आपला  विजय झाला- अक्षय कर्डिले

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू असून पहिल्या पाच फेऱ्यांमध्येच महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी निर्णय आघाडी घेतली

अक्षय कर्डिले आता मतमोजणी केंद्राकडे रवाना होत आहेत

राहुरी मतदारसंघात त्यांचे ठीक ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे

अक्षय कर्डीले यांनी साम टीव्हीला दिली पहिली प्रतिक्रिया

राहुरी मतदारसंघातील मतदारांनी आपल्यावर टाकलेला विश्वास आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांमुळे आपला हा विजय आहे

आपल्या वडिलांनी केलेली विकास कामे आणि उर्वरित विकास कामांसाठी यापुढे आपण मतदारसंघासाठी झटत राहू

rahuri bypolls election results : सहावी फेरीअखेर भाजपच्या अक्षय कर्डिले यांची 29903 मतांची आघाडी

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक -

सहावी फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 29903

राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 4417

वंचित संतोष चोळके- 2178

अपक्ष रावसाहेब खेवरे- 2042

सहावी फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 25486 मतांनी आघाडीवर

Baramati bypolls election results: सातव्या फेरी अंती सुनेत्रा पवार यांना ५२ हजार ४५२ मतांची आघाडी

बारामती -

सातव्या फेरी अंती सुनेत्रा पवार यांना ५२ हजार ४५२ मतांची आघाडी

Baramati bypolls election results : बारामतीमध्ये पाचव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार ४५ हजार १० मतांनी आघाडीवर

rahuri bypolls election results : पाचव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डिले 21 हजार 886 मतांनी आघाडीवर...

rahuri bypolls election results :राहुरीत झळकले अक्षय कर्डिलेंच्या विजयाचे बॅनर

चौथ्या फेरी अखेर भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 18 हजार 123 मतांची आघाडी...

अद्याप 23 फेऱ्यांची मतमोजणी बाकी...

अंतिम निकालाआधीच राहुरी शहरात झळकले अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर...

कार्यकर्त्यांकडून कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर...

Baramati rahuri bypolls election results : चौथ्या फेरीनंतर सुनेत्रा पवार ३६ हजार ५९१ मतांनी आघाडीवर

rahuri bypolls election results : चौथ्या फेरी अखेर भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 18 हजार 123 मतांची आघाडी...

rahuri bypolls election results : तिसऱ्या फेरी अखेर अक्षय कर्डीलेंची 14711 मतांनी आघाडी, काँग्रेस उमेदवाराला किती मते?

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक

तिसऱ्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 16852

राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 2141

वंचित संतोष चोळके- 1022

अपक्ष रावसाहेब खेवरे- 784

तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 14711 मतांनी आघाडीवर

rahuri bypolls election results : अक्षय कर्डिले ९,६३७ मताधिक्क्याने आघाडीवर

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले ९,६३७ मताधिक्क्याने आघाडीवर.

Baramati bypolls election results : सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल, तब्बल २६ हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी

तिसऱ्या फेरी शेवटी सुनेत्रा पवार यांनी २६ हजार ७७३ मतांनी आघाडी घेतली आहे. सुनेत्रा पवार मोठा विक्रम करण्याची शक्यता आहे.

Baramati bypolls election results : दुसऱ्या फेरी अखेर सुनेत्रा पवार 16543 मतांनी आघाडीवर..

दुसऱ्या फेरी अंती निकाल

एकूण मतं: १६ हजार ८४३

सुनेत्रा पवार: १६ हजार ५४३

इतर: ३००

rahuri bypolls election results : पहिल्या फेरीअखेर अक्षय कर्डिले 4266 मतांनी आघाडीवर

पहिल्या फेरीनंती भाजपाचे अक्षय कर्डिले 4266 मतांनी आघाडीवर...

एकूण मते - 6379

अक्षय कर्डिले _4988

गोविंग मोकाटे ( राष्ट्रवादी ) - 722

संतोष चोळके वंचित - 356

Baramati bypolls election results : पहिल्या फेरीअखेर सुनेत्रा पवार 6500 मतांनी आघाडीवर

बारामती विधानसभा पोटनिवडणूक

पहिल्या फेरीअखेर सुनेत्रा पवार 6500 मतांनी आघाडीवर

दुसऱ्या फेरीत सुद्धा सुनेत्रा पवार पुढे

rahuri bypolls election results :  अक्षय कर्डिलेंची मोठी आघाडी

राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पहिल्या काही फेऱ्यात भाजपच्या अक्षय कर्डीले यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

rahuri bypolls election results : पहिल्या फेरीत भाजपचे अक्षय कर्डिले 460 मतांनी आघाडीवर 

rahuri bypolls election results राहुरीत अक्षय कर्डिले आघाडीवर

पोस्टल मतमोजणीत भाजपचे अक्षय कर्डीले आघाडीवर आहेत. थोड्याच वेळात EVM मतमोजणीला सुरूवात होणार आहे. कर्डीले यांचा विजय निश्चित मानला जातोय.

Baramati bypolls election results पोस्टल मतमोजणीत सुनेत्रा पवार यांची आघाडी

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतदानामध्ये सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली आहे.

मतमोजणी प्रक्रियेच्या सुरुवातीला काही वेळापूर्वीच कडक सुरक्षेत 'स्ट्रॉंग रूम' उघडण्यात आले. सध्या या स्ट्रॉंग रूममधून २० ईव्हीएम (EVM) मशीन मतमोजणीसाठी बाहेर काढण्यात आल्या असून, प्रत्यक्ष मोजणीला वेग आला आहे. या निकालाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

rahuri bypolls election results पुण्यात अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागण्याआधीच

पुण्यात अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर

भाजप पदाधिकाऱ्यांनी लावले अक्षय कर्डिलेंचे बॅनर

मित्रा आमदार झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा बॅनर वर मजकूर

राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात

निकाल लागण्याआधीच अक्षय कर्डिलेंचे पुण्यात बॅनर

Baramati bypolls election results :  बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर

सुरूवातीच्या कलांमध्ये बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना मोठी आघाडी मिळाली आहे. थोड्याचवेळात निकाल जाहीर होऊ शकतो.

Baramati rahuri bypolls election results : बारामती-राहुरीत कोण मारणार बाजी? मतमोजणीला सुरूवात

बारामती आणि राहुरीमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे. थोड्याचवेळात निकाल स्पष्ट होईल. सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित मानला जातोय.

Baramati rahuri bypolls election results थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात

राहुरी आणि बारामती मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित मानला जातोय.

Sunetra Pawar नवा विक्रम रचणार? राज्याचं लक्ष | Baramati By-Election Result

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 8 वाजता सुरू होत आहे. 23 एप्रिल रोजी झालेल्या मतदानात 58% मतदारांनी हक्क बजावला होता. या निवडणुकीत मुख्य विरोधक नसल्याने महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्य मिळवणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय.. संसदीय इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवण्यासाठी त्यांना 1 लाख 65 हजार मतांची गरज आहे. एकूण 2 लाख 23 हजार मतदारांपैकी किमान 1 लाख 23 हजार 265 मतं मिळाल्यास नवा विक्रम प्रस्थापित होईल. मतमोजणीसाठी 20 ईव्हीएम टेबल आणि 6 पोस्टल टेबल सज्ज आहेत.

राहुरी, बारामती पोटनिवडणुकीचा आज फैसला! | Baramati & Rahuri By-Election Result

Baramati bypolls election results बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी

२३ एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानादिवशी ५८ टक्के मतदान

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मताधिक्याचा नवा विक्रम नोंदवणार का याकडे राज्याचे लक्ष

ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीसाठी २० टेबल, तर पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी ६ टेबलांची व्यवस्था

सकाळी ८ वाजता होणार मतमोजणीला सुरुवात

Baramati rahuri bypolls election results : बारामती-राहुरीत कोण मारणार बाजी? थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. या निकालामुळे स्थानिक राजकारणाची आगामी दिशा स्पष्ट होणार आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षाचा पुढचा अंक कोणाच्या बाजूने लागणार आणि राहुरीची जनता कोणाला कौल देणार, याची धाकधूक वाढली आहे. पाहा निकालाचे प्रत्येक अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: ओपन पोर्स कमी करुन त्वचेला कूलिंग देण्यासाठी वापरा घरी तयार केलेला हा स्पेशल वॉटर स्प्रे

पत्नीची निर्घृण हत्या केली, मृतदेहाचे ५ तुकडे पाण्याच्या टाकीत फेकले; पतीच्या भयानक कृत्यानं खळबळ

Maharashtra News Live Update: महागाईच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबारमध्ये आंदोलन

Vinchu Chavlyavr Upay: विंचवाचं विष शरीरात किती काळ टिकतं?

Heart attack symptoms: अचानक चक्कर, घाम आणि श्वास घेण्यास त्रास? हार्ट अटॅकपूर्वीची ही लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT