Baramati Crime News, Satara, Phaltan Saam TV
महाराष्ट्र

Baramati Crime News : सातारा जिल्ह्यातील युवकाचा बारामतीत खून

पोलिसांचे पथक संशयितांना शोधण्यासाठी रवाना झालेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.

मंगेश कचरे

Baramati Crime News : सातारा जिल्ह्यातील मठाचीवाडी (ता. फलटण) येथील एकाचा बारामती (Baramati) शहरात भरदिवसा खून झाल्याची घटना घडली आहे. हा खून अल्पवयीन मुलांनी केल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली. संबंधित संशयित आराेपीचा शाेध घेण्यासाठी पाेलिसांचे पथक रवाना झाला आहे.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार बारामती शहरातील श्रीरामनगर भागात जुन्या वादाच्या कारणातून अल्पवयीन मुलांनी एकाचा खून केला. शशिकांत बाबासाहेब कारंडे (मूळ राहणार मठाचीवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा) सध्या राहणार एचडीएफसी बँक मागे भिगवण रोड बारामती असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शहरातील श्रीरामनगर भागातील कवी मोरोपंत शाळेजवळ गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. कारंडे हे त्यांच्या नातवाला नेण्यासाठी कविवर्य मोरोपंत शाळेजवळ आले होते. यादरम्यान काहींनी त्यांच्यावर कु-हाडीनं हल्ला केला.

या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. कारंडे हे बारामतीत एका कंपनीत नोकरीस होते. दरम्यान कारंडे यांच्या मुलाची यापूर्वी भांडणे झाली होती. त्या वादातून हा खून झाल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र याला दुजोरा दिला नाही. पोलिसांचे पथक संशयितांना शोधण्यासाठी रवाना झालेत अशी माहिती सुनील महाडिक (पोलीस निरीक्षक बारामती) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Injured: चेहऱ्यावर सूज अन् ओठांवर जखमा! प्रसिद्ध अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हादरले; सांगितला धक्कादायक अनुभव

Maharashtra News Live Update: जात पडताळणी समिती रद्द करा मनोज जरांगे पाटील यांची मोठी मागणी

Mosambi Juice Benefits for Skin: चमकदार आणि डागविरहीत त्वचेसाठी रोज प्या मोसंबीचा रस; जाणून घ्या आश्चर्यकारक सौंदर्य फायदे

जरांगे पाटलांचा सरकारला थेट अल्टिमेटम! 'या' १३ मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत रणांगण, पाहा संपूर्ण यादी

Acicdent News : मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने ७ वाहनांना उडवले, ३ जणांचा मृत्यू, १० गंभीर

SCROLL FOR NEXT