Baramati News Saam tv
महाराष्ट्र

Baramati News : पाण्याच्या जारचा धक्का लागल्याने दोन मुलांना मारहाण; १६ जणांवर गुन्हा दाखल

Baramati News : बारामती जिल्ह्यातील भिगवण येथे १७ सप्टेंबरला कार्यक्रम असल्याने दोन जण पिण्याच्या पाण्याचे जार आणण्यासाठी गेले होते.

मंगेश कचरे

बारामती : पाण्याच्या जारचा धक्का लागला म्हणून दोन मुलांना मारहाण केल्याची घटना बारामती जिल्ह्यातील भिगवण येथे घडली. यानंतर दोन गट भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी भिगवण पोलिसात १६ जणांवर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भिगवण बंद ठेवत आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. 

बारामती (Baramati) जिल्ह्यातील भिगवण येथे १७ सप्टेंबरला कार्यक्रम असल्याने दोन जण पिण्याच्या पाण्याचे जार आणण्यासाठी गेले होते. दरम्यान पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांकडून पाण्याच्या जारचा धक्का लागला. या कारणातून दोन्ही मुलांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणानंतर भिगवण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून १६ जणांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. 

भिगवणमध्ये कडकडीत बंद 

सदर घटनेत मारहाण करण्यात आलेल्यांमधील एका जणाला (Police) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र अन्य मारहाण करणारे अद्याप सापडलेले नाहीत. यामुळे उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज भिगवणमध्ये बंद पाळण्यात आला असून निषेध मोर्चा देखील काढण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT