Ujani Dam Saam tv
महाराष्ट्र

Ujani Dam : पुण्यासह सोलापूर, नगर जिल्हा वासियांची चिंता वाढणार; उजनी धरणात केवळ २ टीएमसीच जिवंत पाणीसाठा

Baramati News : पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण पुढील दोन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे. उजनी धरण हे केवळ आता साडेतीन टक्के प्लस आहे

मंगेश कचरे

बारामती : पाण्याचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत चालला आहे. त्यानुसार उजनी धरणाची वाटचाल देखील आता मृत पाणी साठ्याकडे जात असून पुढील दोन दिवसात उजनी धरण मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे. धरणात केवळ २ टीएमसीच जिवंत पाणीसाठा शिल्लक असून पुण्यासह सोलापूर व अहिल्यानगर जिल्हा वासियांची चिंता वाढणार आहे. 

पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण पुढील दोन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे. उजनी धरण हे केवळ आता साडेतीन टक्के प्लस आहे. म्हणजे उजनीमध्ये केवळ दोन टीएमसी इतकाच जिवंत पाणीसाठा राहिला आहे. त्यानंतर धरण हे मृत पाणी साठ्यात जाणार आहे. सध्या उजनी धरणामधून भीमा नदीपात्रामध्ये सहा हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.

पुण्यासह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी म्हणून उजनी धरणाची ओळख आहे. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ११० टक्के भरले होते. धरणाची पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी असून यापैकी ६३ टीएमसी पाणीसाठा मृतसाठा असतो. तर ५४ टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात असते. सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवून क्षमतेच्या ६५ पूर्णांक ५७ टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे.

धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट 

पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यामुळे तिन्ही जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटला होता. दरम्यान भीमा नदी काठावरील गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाल्याने धरणातून भीमा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे देखील धरणातील पाणी साठा कमी होत आहे. तर दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचा परिणाम देखील धरण साठ्यावर होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT