Baramati News Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; राज्यात २२ लाख एकर शेतीचे नुकसान, कृषी मंत्री भरणे यांची माहिती

Baramati News : नुकसानीची माझ्यासारख्या कार्यकर्त्यांने तुमचा सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न

मंगेश कचरे

बारामती : मागील आठवडाभरापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले असून मागील दहा दिवसात राज्यात पावसामुळे तब्बल २२ लाख एकर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

मागील दहा दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजविला आहे. नदी- नाल्यांना पूर आल्याने या पुराचे पाणी शेतांमध्ये शिरले आहे. यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. यात राज्यात साधारण बावीस लाख एकरावर शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. 

शेतकऱ्यांना शक्य तितकी मदतीचा प्रयत्न 

दरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अनेक भागात पाहणी केली असून या नुकसानीची माझ्यासारख्या कार्यकर्त्यांने तुमचा सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे म्हटले आहे.

इंदापूर तालुक्यातील जंक्शन गावात रोहित मोहोळकर मित्रपरिवाराच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची खास उपस्थिती होती. या कार्यक्रमावेळी भरणे यांनी एका गोष्टीचा विशेष उल्लेख केला की प्रत्येक वर्षी तुमच्या या दहीहंडी सोहळ्यात मोठ्या आनंदाने सहभागी होतो. मात्र यावर्षी मला माफ करा सांभाळून घ्या कारण राज्यातील शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट आले असल्याने तुमच्या आनंदात सहभागी होऊ शकत नसलो नाही. तरी मी तुमच्या सुखदुखात कायम असल्याचा आश्वासनही भरणे यांनी यावेळी दिल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT