Baramati News Saam tv
महाराष्ट्र

Baramati: विद्युत तार तुटून पडली अंगावर; शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू

विद्युत तार तुटून पडली अंगावर; शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू

मंगेश कचरे

बारामती : विद्युत खांबावरील तार तुटून अंगावर पडल्याने शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. सदर घटना भोर (Bhor) तालुक्यातील वरवडी गावात घडली आहे. सुभद्रा सोनबा वरे असे मृत्यू (Death) झालेल्या महिलेचे नाव आहे. (Baramati News Women Death Shock)

शेतात काम करीत असताना अंगावर विजेची तार पडून वृद्ध महिलेचा शॉक (Electric Shock) लागून जागीच मृत्यू झाला. सुभद्रा वरे असे मृत्यू झालेल्या आजीचे नाव आहे. भोर तालुक्यातील वरवडी खुर्द गावातील ही दुर्दैवी घटना आहे. सुभद्रा आजी या सोमवारी दुपारी शेतात शेंगा काढत होत्‍या. या दरम्‍यान गावातील लघुदाब वाहिनीची तार पाऊस, वाऱ्यामुळे तुटून अंगावर आजींच्‍या अंगावर पडल. यात त्‍यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज (MSEDCL) महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महावितरणचे दुर्लक्षच

वारा, पावसात अनेकदा तार तुटत असतात. परंतु, वारा– वादळानंतर सर्व विद्युत तारांची पाहणी करणे आवश्‍यक आहे. परंतु, महावितरणकडून हे होत नाही. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ही दुदैवी घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT