Ashadhi Wari Saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari: निरा नदीत संत तुकाराम महाराज पादुकांना स्नान

निरा नदीत संत तुकाराम महाराज पादुकांना स्नान

मंगेश कचरे

बारामती : आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे जात असलेल्‍या संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे (Pune) जिल्ह्यातून येत सोलापूर जिल्ह्यात पोहचला आहे. वैष्णवांना पंढरीच्या विठुरायाला भेटण्याची आस लागली आहे. तत्‍पुवी सोलापूर (Solapur) जिल्‍ह्यात प्रवेश झाल्‍यानंतर संत तुकाराम महाराजांच्‍या पादुकांचे निरा नदीत स्‍नान करण्यात आले. (baramati news Bathing of Saint Tukaram Maharaj Padukan in Nira river)

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पादुकांना आज सकाळी निरा स्नान घालण्यात आलेय. निरा नदीत यंदा मुबलक पाणी होते. माऊली माऊलीचा (Ashadhi Wari) गजर करत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सराटी या शेवटच्या गावातील मुक्काम आटोपल्यानंतर आज सकाळी पादुका स्नान घालण्यात आले. पादुका स्नानानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यातील प्रवेश झाला.

तिसरे गोल रिंगण होणार

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात मानाचे तिसरे गोल रिंगण रंगणार आहे. हे रिंगण झाल्यानंतर पालखी सोहळा याच विद्यालयात मुक्कामासाठी थांबेल. यानंतर उद्या पालखी पुढे मार्गस्‍थ होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambajogai News : स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला नगरपरिषद कार्यालयाबाहेर; अंबाजोगाईत लिंगायत समाज आक्रमक

Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

SCROLL FOR NEXT