ajit pawar reaction on maratha reservation manoj jarange patil demand Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा समाजाला OBC मधून आरक्षण देता येणार नाही; उपमुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Ajit Pawar on Maratha Reservation: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान केलं आहे.

Satish Daud

Ajit Pawar on Maratha Reservation

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

२४ ऑक्टोबरच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण करु, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणाबाबत मोठं विधान केलं आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. एकाच्या तोंडाचा घास काढून दुसऱ्याच्या तोंडी टाकता येणार नाही, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या विधानामुळे मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले अजित पवार?

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मोठं विधान केलं. आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. तुमच्याकडे काही पर्याय असतील किंवा चर्चा करायची असेल तर आम्ही कधीही तयार आहोत. मीही मराठ्याच्या पोटीच जन्माला आलोय, असं अजित पवार म्हणाले.

'मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही'

आमचा जो गरीब मराठा वर्ग आहे. ज्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही अशा लोकांना आरक्षण द्यावं, या मताचा मी आहे. पण कुणाच्या तरी तोंडातला घास काढून तो दुसऱ्याच्या तोंडात देणं बरं नाही. आरक्षणाची मागणी करणाऱ्यांबद्दल आम्हाला अजिबात आक्षेप नाही, असं अजित पवार म्हणाले.

आम्ही मराठा समाजाच्या मागण्या टाळतोय असं नाही. पण आजपर्यंत ज्यांना आरक्षणाची मदत झाली त्या वर्गाला धक्का बसू न देता आरक्षण दिले पाहिजे ही सगळ्यांचीच भूमिका आहे. वेळ मारुन नेण्याचा माझा स्वभाव नाही. जे करायचंय ते शक्य असेल तर वाटेल ती किंमत मोजून मी करणारच, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT