Pravin Mane Saam TV
महाराष्ट्र

Pravin Mane : बारामतीत हाय होल्टेज ड्रामा; सुळे यांचे प्रचारप्रमुख आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार

Baramati Lok Sabha Constituency : आम्ही ठामपणे अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून आम्ही त्यांचा प्रचार सुरू करत आहोत, अशा शब्दांत प्रवीण मानेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Ruchika Jadhav

Baramati :

बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या बारामती मतदारसंघातील उमेदवार खासदार सुप्रिया सुळेंना निवडणूक होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे. सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले प्रवीण माने अजित पवार गटामध्ये सहभागी झाले आहेत.

माने कुटुंब पवार कुटुंबीयांसोबत राहिलं आहे. अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी माने कुटुंब त्यांच्याबरोबर राहणार आहे, असं म्हणत मानेंनी आपल्या हाती घड्याळ बांधलं आहे.

अजित पवार हे विकसासाठी भाजप बरोबर गेले आहेत. आम्ही देखील विकास व्हावा यासाठी अजित पवार यांच्याबरोबर जात आहोत. अजित पवारांनी अनेक विकास कामे केली आहेत. आम्ही ठामपणे अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून आम्ही त्यांचा प्रचार सुरू करत आहोत, अशा शब्दांत प्रवीण मानेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय होवून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असंही प्रविण माने यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

SCROLL FOR NEXT