ajit pawar 
महाराष्ट्र

करुन दाखवलं! अजित पवारांची सूचना अन् निवडणुक झाली बिनविराेध

केवळ घाेषणेची आैपचारिकता राहिली आहे.

मंगेश कचरे

बारामती (Ajit Pawar Latest News) : तुम्ही सारं व्यवस्थित करा या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेस अधीन राहून कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे बारामती सहकारी बॅंकेची निवडणुक बिनविराेध हाेणार याचे चित्र प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर स्पष्ट झाले आहे. या बॅंकेच्या (bank) निवडणुकीत (election) ८१ उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल हाेते. त्या पैकी आता केवळ १५ उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. baramati cooperative bank election

या बॅंकेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस बुधवार (ता.८) हाेता. दुपारपर्यंत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे तेरा उमेदवार वगळता तीन उमेदवारी अर्ज राहिल्याने बँकेची निवडणूक होणार अशी चर्चा रंगली हाेती. परंतु राष्ट्रवादीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे अखेरच्या टप्प्यात निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. या निवडणुकीसाठी तीन ठिकाणी अर्ज भरलेल्या डॉ. विजयकुमार भिसे यांनी त्यांचे सर्व मागे घेतल्याने निवडणुक टळली.

असे असेल नवे संचालक मंडळ

बारामती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी दाखल असलेल्या अर्जांपैकी आता केवळ राेहित घनवट, वंदना पाेतेकर, कल्पना शिंदे, जयवंतराव किकले, मंदार सिकची, उद्धव गावडे, किशाेर मेहता, विजय गालिंदे, नुपुर वडूजकर, नामदेव तुपे, डाॅ. साैरभ मुथा, रणजित धुमाळ, शिरीष कुलकर्णी, देवेंद्र शेवाळे, सचिन सातव यांचे अर्ज राहिल्याने हे सर्वजण बिनविराेध निवडून येणार आहेत यात शंका नाही. केवळ घाेषणेची आैपचारिकता राहिली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT