Deputy Chief Minister Sunetra Pawar  saam tv
महाराष्ट्र

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांविरोधात मुंडे निवडणुकीच्या रिंगणात, बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार नाही

Karuna Munde Joins Baramati Poll Race: करुणा मुंडे बारामती पोटनिवणूक लढवणार आहेत. सुनेत्रा पवार यांना त्यांनी आव्हान दिले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या बारामतीमध्ये दाखल झाल्या आहेत.

Priya More

Summary -

  • बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही

  • करुणा मुंडे निवडणूक लढवणार

  • करुणा मुंडेंनी सुनेत्रा पवारांना दिलं आव्हान

  • काँग्रेसने आकाश मोरेंना दिली उमेदवारी

सचिन जाधव, पुणे

बारामती पोटनिवडणुकीसाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्द दाखल केला. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उभे राहिलेल्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणुकीतून माघार घेतली. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. आता करुणा मुंडे या देखील बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत. थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे बारामतीमधील पोट निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

करुणा मुंडे या बारामतीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या आहेत. बारामतीची पोटनिवडणूक करुणा मुंडे लढवणार असल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. करुणा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी साम टीव्हीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, 'लोकशाही टिकवण्यासाठी मी ही निवडणूक लढणार आहे. बारामतीतील शेतकरी, सामान्य माणसाच्या विकासासाठी ही निवडणूक लढवणार आहे. मी बारामती पाहिली नाही त्यामुळे विकास काय झाला आहे हे मला माहिती नाही. पण अनेक बारामतीकर माझ्याकडे आले आहेत. त्यामुळे मी निवडणूक लढवत आहे. निवडणूक बिनविरोध करावी असं कुठे लिहिलेलं नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतही घोळ; प्रश्नपत्रिकेत आले एकाच पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न

'मुन्नाभाईंची लातूर फॅक्टरी; कुलकर्णीनंतर CBIच्या मोटेगावकरला बेड्या,10 दिवसांआधीच मिळाला होता NEET चा पेपर?

Fact Check: 2 दिवसांत भारतातील पेट्रोल संपणार? युद्धामुळे देशावरील इंधनाचं संकट वाढलं?

पार्टनरची साथ मिळेल, मानसिक तणाव कमी होईल; ५ राशींच्या लोकांसाठी सोन्यासारखा दिवस ठरणार

Crime: भयंकर! लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, झाडाला बांधून अल्पवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

SCROLL FOR NEXT