sangli , lightning , bapu narale , ghorpadi saam tv
महाराष्ट्र

Sangli News : परतीच्या पावसाचा शेतकरी कुटुंबावर घात; घोरपडीत वीज पडून एक ठार

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विजय पाटील

Sangli News : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथे वीज (lightning) अंगावर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Maharashtra News)

सांगली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मंगळवारी पाऊस झाला. कवठेमहाकाळ तालुक्यातील घोरपडीसह परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. बापू नरळे हे मोटारसायकलने शेतातून नरळेवस्तीवरील घराकडे जात होते. अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. (Sangli Latest Marathi News)

अंगावर वीज पडताच बापू हे मोटरसायकलवरून खाली पडले. त्यांचे शरीर काळे पडले होते. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT