काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे बंजारा नृत्य  लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे बंजारा नृत्य

पटोले यांनी मंठा येथे 'काँग्रेस आपल्या दारी' या कार्यक्रमाला हजेरी लावली. काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी आयोजीत केलेल्या या कार्यक्रमात पटोले यांचं बंजारा समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं.

लक्ष्मण सोळुंके

जालना : बऱ्याचदा संगीताच्या तालावर मोह न आवरता ठेका धरणारे आणि मनमुराद नाचणारे अनेक राजकीय नेते आपण पाहिले असतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आज जालन्यात बंजारा संगीतावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले.

हे देखील पहा -

नाना पटोले आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पटोले यांचा जालना शहरात आणि वाटूर येथे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर पटोले यांनी मंठा येथे 'काँग्रेस आपल्या दारी' या कार्यक्रमाला हजेरी लावली. काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी आयोजीत केलेल्या या कार्यक्रमात पटोले यांचं बंजारा समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं.

या स्वागत सोहळ्यात बंजारा समाजबांधवांनी पारंपारीक नृत्य सादर करत आणि ढोल वाजवत पटोले यांचं स्वागत केलं. या स्वागत सोहळ्यात पटोले यांनी स्वतः ढोल वाजवत बंजारा नृत्य सादर करत उपस्थितांचा आनंद वाढवला. स्वागत सोहळ्यात सहभागी झालेल्या पटोले यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्यासोबत बंजारा नृत्य केलं.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT