Nagpur  saam tv
महाराष्ट्र

Nagpur Clash: नागपूर दंगलीचं बांगलादेश कनेक्शन? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Nagpur Riots: नागपूर दंगलीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे राज्य हादरले आहे. या दंगलीला थेट बांग्लादेशी कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे, ज्यामुळे सुरक्षा चिंता वाढली आहे.

Bharat Mohalkar

राज्याला हादरवणाऱ्या नागपूर दंगलीबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या दंगलीचं थेट बांगलादेश कनेक्शन समोर आलं आहे. मात्र हे कनेक्शन नेमकं कसं आहे? तपासात कोणत्या बाबी समोर आल्यात? पाहूयात या विशेष रिपोर्टमधून.

नागपूर दंगल प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या दंगलीचं थेट बांगलादेशी दहशतवादी संघटनांशी कनेक्शन असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. अभी तो सिर्फ अटॅक हुआ है, अशी पोस्टही समोर आली आहे. त्यामुळे ही माहिती समोर आल्यानंतर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे, तर मास्टरमाईंड फहीमसह ६ आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र पोलीस तपासात कोणत्या गोष्टी समोर आल्यात?

बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा राड्यात सहभाग असल्याचा ठपका

हिंसाचाराला कारणीभूत व्हिडीओ बांगलादेश आणि इतर देशातील

हिंसाचार भडकवणारे 172 व्हिडीओ पोलिसांच्या हाती

बांगलादेशातील आयपी अॅड्रेसवरुन व्हिडीओ व्हायरल झाल्याचं उघड

मोबाईल नंबर आणि आयपी अॅड्रेसवरुन तपास सुरू

ही माहिती समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

आतापर्यंत देशातील हिंसाचारामागे पाकिस्तान कनेक्शन समोर येत होतं. मात्र पाकिस्तान पाठोपाठ आता बांगलादेशातील दहशतवादी संघटनाही भारतात हिंसाचार पसरवत असतील तर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क असणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर फहीम खानचा मोबाईल ताब्यात घेऊन पोलिस आणि गुप्तचर संस्थांनी बांगलादेशातील दहशतवादी संघटना आत्तापासून नेस्तनाबूत करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT