bandatatya karadkar saam tv
महाराष्ट्र

Bandatatya Karadkar: माझं चुकलं, मी माफी मागताे! वाचा बंडातात्यांचा माफीनामा

साता-यात गुरुवारी झालेल्या आंदाेलनात बंडातात्या कराडकरांनी नेत्यांवर टीका केली हाेती.

ओंकार कदम

सातारा : आमदार बाळासाहेब पाटील यांच्या चिंरजीवबद्दल अनावधाने वक्तव्य केले गेले. माझे वक्तव्य हे निराधार आहे. माझ्याकडून बाेलण्यातून चूक झाली. माझे आणि बाळासाहेब पाटील यांचे निकटचे संबंध आहेत. त्यांच्या विषयी माझ्याकडून झालेले वक्तव्याबद्दल मी माफी मागताे असं ह.भ.प बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) यांनी साम टीव्ही बराेबर बाेलताना नमूद केले. बंडातात्या कराडकर हे गुरुवारी सातारा (satara) येथे व्यसनमुक्त संघच्या वाईन विक्रीच्या निर्णयाच्या विराेधातील आंदाेलनात सहभागी झाले हाेते. त्यावेळी बंडातात्यांनी काेणता पुढारी मद्य घेत नाही असं म्हणत अनेक मान्यवर नेत्यांची नावे घेत टीका केली हाेती. आज (शुक्रवार) बंडातात्यांनी साम टीव्ही बराेबर बाेलताना सर्व वक्तव्यांबद्दल माफी मागितली आहे. (Bandatatya Karadkar Latest News Updates)

बंडातात्या म्हणाले गुरुवारी झालेल्या वाईन विक्रीच्या निर्णया विराेधातील आंदाेलनात मी बाळासाहेब पाटील (balasaheb patil) यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांची नावे घेत त्यांच्यावर आराेप केले. खरंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बाेलताना माझ्याकडून चूक झाली. त्यामुळे सर्व नेत्यांची आणि विशेष म्हणजे बाळासाहेब पाटील यांच्या कुटुंबियांची मी माफी मागताे असे बंडातात्यांनी नमूद केले.

बाळासाहेब यांचे चिरंजीव यांचे वागणं तसं नाही. त्यांचे कार्य उत्तम आहे. अनेक वर्षांपासून माझे त्यांच्याशी निकटचे संबंध आहेत. त्यामुळे बाळासाहेबांविषयी दिलगिरी व्यक्त करताे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmers : हातातोंडाशी आलेला घास पाण्यात, शेतातील कपाशीचं पीक वाया; शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

Maharashtra Live News Update: गेवराईत 3 एकर बागायती जमीन गेली वाहून

Kalyan: कामावर गेला पण परत आलाच नाही, हाय टेन्शन वायरला स्पर्श; विजेचा झटका लागून तरुणाचा जागीच मृत्यू

Pandharpur News: पंढरपूरमध्ये शासकीय धान्याचा काळाबाजार उघड – दोन ट्रक जप्त|VIDEO

Horrific Accident : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचा थरार; सरस्वती पूजन करून परतताना विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT