ban leaders in village and taluka places says raju shetti saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti News : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करु : राजू शेट्टी

जळगाव जामोद येथे नुकताच राजू शेट्टींचा दाैरा झाला.

संजय जाधव

Buldhana News :

शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करा अन्यथा गाव, तालुक्यात पुढा-यांना बंदी करु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (swabhimani shetkari sanghatana leader raju shetti) यांनी सरकारला दिला आहे. ते जळगाव जामोद येथे बाेलत हाेते. (Maharashtra News)

गेल्या 16 दिवसापासून शेतकऱ्याच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर (prashant dikkar) यांच्या नेतृत्वात शेगाव ते जळगाव जामोद अशी आत्मक्लेश परिवर्तन पायी यात्रा काढण्यात आली होती. या पायी यात्रेचा समारोप राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत जळगाव जामोद येथे करण्यात आला. त्यानंतर भव्य सभा झाली.

यावेळी राजू शेट्टींनी जर शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर केल्या नाहीत तर येत्या काळात सर्व पुढाऱ्यांना आमदार मंत्री यांना गाव बंदी करू असा इशारा सरकारला दिला. ते म्हणाले सरकारने पाम तेलाचा आयात कर कमी केल्याने सोयाबीनचे भाव धडाधड कोसळले. चुकीच्या धाेरणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. सरकारने धाेरणं बदलली नाहीत तर सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील शेट्टींनी दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT