Balbharati Controversial Poem  Saam Digital
महाराष्ट्र

Balbharati Controversial Poem : बालभारतीच्या पुस्तकात 'वन्स मोअर'चा शोर; पहिलीच्या कवितेत हिंदी, इंग्रजीवर जोर

Purvi Bhave Poem : इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात 'जंगलात ठरली मैफल' ही पूर्वी भावेंची कविता घेण्यात आलीय. मात्र कवितेच्या कडव्यांमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेतील 'वन्समोअर' 'शोर' 'बात' या शब्दांचा वापर करण्यात आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकावरून मोठा वाद सुरू झालाय. बालभारतीच्या पुस्तकातील कवितेत यमक जुळवण्याच्या नादात मराठी भाषेची लक्तरं वेशीला टांगण्याचा प्रकार समोर आलाय. भाषेची कशी मोडतोड झालीय ते पाहूयात...

ठुमकत नाचत आला मोर

वन्समोअर, वन्समोअर झाला शोर

कवितेच्या या दोन ओळींमध्ये यमक जुळवण्याच्या नादात मराठीसह इंग्रजी आणि हिंदीचा वापर करण्यात आलाय. त्यावरून मोठा वाद उफाळून आलाय. मराठीचे संस्कार घडवायला मराठी शब्द ठाऊक नसणाऱ्यांची कविता लादणारे विद्वान कोण? असा सवाल करत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशींनी बालभारतीवर टीकेची झोड उठवलीय.

पहिल्या वर्गातील मुलांवर मराठी भाषा संस्कार करण्यासाठी इंग्रजी, हिंदी शब्द असणाऱ्या कविता निवडाव्या, असे निवड मंडळाला कोणाचे निर्देश आहेत का? ज्यांना मुलांवर मराठी संस्कार घडवायला मराठी शब्ददेखील ठाऊक नसावेत, अशांची ही कविता लादणारे कोण विद्वान आहेत? असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशींनी विचारलाय.

इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात 'जंगलात ठरली मैफल' ही पूर्वी भावेंची कविता घेण्यात आलीय. या कवितेत जंगलातील प्राण्यांच्या मैफलीचं वर्णन करण्यात आलंय. यामध्ये अस्वल, हत्ती, कोल्होबा, वाघोबा अशी नावं प्राण्यांना देण्यात आलीत. मात्र कवितेच्या कडव्यांमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेतील 'वन्समोअर' 'शोर' 'बात' या शब्दांचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे ही कविता सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झालीय. बालभारती कवितांची निवड कोणत्या निकषांवर करते? असा सवालही उपस्थित झालाय. मात्र बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी मात्र कवितेच्या निवडीचं समर्थन केलंय.

पहिलीच्या विद्यार्थ्यांना कविता, बडबडगीतातून शिक्षणाची आणि मातृभाषेची गोडी निर्माण व्हावी हा उद्देश असतो. मात्र या कवितेत तेही दिसत नाही. तर दुसरीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना बालभारतीतल्या पुस्तकातील जंगलातल्या या मैफलीनं भाषेची तर ऐशीतैशी केलीय. त्यामुऴे बालभारती ही कविता पुस्तकातून वगळणार का अशी चर्चा सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

Petrol Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे भाव

Coconut Water : उन्हाळ्यात रोज नारळ पाणी प्यायल्याने काय होते? जाणून घ्या फायदे

Pune Accident: नवले पुलावर सलग दुसऱ्या दिवशी अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक; चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

Homemade Hair Mask For Hair Growth: दाट आणि लांब केसांसाठी घरीच बनवा 'हेअर मास्क', एक महिन्यातच दिसेल फरक

SCROLL FOR NEXT