balasaheb thorat Saam TV
महाराष्ट्र

Balasaheb Thorat: नाना पटोलेंसोबत काम करणे अशक्य; बाळासाहेब थोरातांचं पक्षश्रेष्ठींना पत्र

परिस्थिती अशीच राहिली तर काँग्रेसमध्ये दोन गट होतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Rashmi Puranik

मुंबई : नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यानच्या गोंधळात गप्प असलेल्या काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी काल मौन सोडलं. विधानपरिषद निवडणूक दरम्यान जे काही घडलं, जे राजकारण झालं ते व्यथीत करणारं होतं, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

याबाबत आता बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी पक्षश्रेंष्ठींना पत्र लिहिलं आहे.

माझ्या विषयी इतका राग असेल तर नाना पटोले यांच्याबरोबर काम करू शकत नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच परिस्थिती अशीच राहिली तर काँग्रेसमध्ये दोन गट होतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विधान परिषद निवडणुकीत राजकारण झालं. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. प्रकरण मिटवण्याऐवजी ते वाढवण्यात आले. सार्वजनिकरित्या कुटुंबाविरोधात वक्तव्य करण्यात आली, असं थोरातांनी म्हटलं आहे.

दरम्यान अहमदनगरमधील कार्यकर्त्यांनावर देखील कारवाई झाली आहे. यात कोठेही माझं मत विचारात घेतले नाही. याबाबत देखील बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. थोरातांच्या पत्रामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Sugar Test Timing: ब्लड शुगर चेक करण्याची योग्य वेळ कोणती? झोपेतून उठल्यानंतर की नाश्ता केल्यानंतर?

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढणार, सरकारकडून आले स्पष्टीकरण, वाचा नेमकं काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांचा 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी देवून होणार सन्मान

T20 Mumbai League: टी-20 मुंबई लीग पुन्हा रंगणार; रोहित शर्माच्या हस्ते ट्रॉफीचं अनावरण, महिला लीगचीही होणार सुरुवात

Zakir Khan : प्रसिद्ध कॉमेडियनची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील 'त्या' VIDEO मुळे चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT