Aurangabad Rename Sambhajinagar
Aurangabad Rename Sambhajinagar Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad Renaming : छत्रपती संभाजीनगर नामकरणावरून श्रेयवादाचं राजकारण पेटलं; नामांतराचा नारा पहिल्यांदा कोणी दिला?

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद की संभाजीनगर हा मुद्दा सर्वसामांन्यांसाठी भावनिक. पण या भावनिक मुद्द्यावर तब्बल ३४ वर्ष राजकारण झाले. महापालिका, विधानसभा, लोकसभा या निवडणुकीत हाच मुद्दा केंद्रस्थानी असायचा. अखेर छत्रपती संभाजीनगर नामकरण झाले. आता राजकारण संपून श्रेयासाठीची लढाई याचं मुद्द्यावर येणाऱ्या महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत दिसणार आहे. (Latest Marathi News)

अखेर छत्रपती संभाजीनगर झालेच. पण ३४ वर्ष क्रांती चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर तोच आवाज असायचा, संभाजीनगर करणारच!. त्यावरून इथ मतांचे ध्रुवीकरण याच मुद्द्यावरून होणार असे सर्वपक्षीय नेत्यांना कळले होते. म्हणून इथ याच मुद्द्यावर चर्चा सुरु असायची.

औरंगाबाद महापालिकेत १९८८ मध्ये ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभेत पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी संभाजीनगरचा नारा दिला होता. तेव्हापासून संभाजीनगर नावाभोवतीच राजकारण फिरत आहे.

१९९५ मध्ये राज्यात पहिल्यांदा शिवसेना (Shivsena) भाजप युतीचे सरकार आले. त्यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. औरंगाबाद महापालिकेने १९ जून १९९५ रोजी हा ठराव मंजूर केला. महापालिकाच नव्हे तर जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्येही हे नाव बदलण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते.

उद्धव ठाकरे सरकारने त्यांच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत संभाजीनगर आणि धाराशीवचा ठराव घेतला. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा छत्रपती संभाजीनगर नामकरणाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे पाठविले होता. त्याच प्रस्तावाला आता केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानंतर शिवसेनेकडून याचं स्वागत केलं गेलं.

छत्रपती संभाजीनगर नामकरण झाल्यानंतर राजकारण संपेल असंही म्हणता येणार नाही. कारण आजी-माजी सरकारी पक्षातून श्रेयावरून राजकारणही येणाऱ्या काळातल्या निवडणुकात दिसून येईल. शिवाय एमआयएमकडून याच विषयावरून राजकारणही केलं जाईल, हे उघडपणे दिसतंय.

३४ वर्ष सुरु असलेलं भावनिक मुद्द्याचं राजकारण संपेल असं वाटत असताना श्रेयाच्या नव्या लढाईला सुरुवात झालीय, ती पुढच्या दोन वर्षात दिसत राहील. कारण निवडणुका आहेत. मात्र हे करताना ३५ वर्ष रखडलेला शहराचा विकास तसाच राहू नये इतकीच अपेक्षा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunidhi Chauhan : चाहत्याने पाण्याची बाटली फेकली, तरीही गात राहिली; सुनिधी चौहानने सांगितला लाइव्ह कॉन्सर्टमधील 'तो' किस्सा

Relationship : वारंवार पार्टनरला मॅसेज केल्यास नात्यात येईल दुरावा; चुकूनही 'या' चुका करू नका

Maval Constituency : मावळ मतदारसंघातील मतदारांच्या अपेक्षांचा भंग, वर्षानुवर्ष सागरी पूल राहिला कागदावरच

Online Payment: 'या' टीप्स वापरा करा तुमचे UPI खातं सुरक्षित

Beed Crime: बीडमध्ये तब्बल २ कोटींचे चंदन जप्त; शरद पवार गटाच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT