Balasaheb Patil comment on bandatatya karadkar controversy statement Saam Tv
महाराष्ट्र

Karad: माझ्या मूलावर टीका करण्यापेक्षा बंडातात्यांनी 'हा' प्रश्न साेडवून दाखवावा; पालकमंत्र्याचे आव्हान

सातारा पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नसताना जमाव गाेळा केल्याने बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : ह.भ.प बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) हे असं का बाेलले हे मला देखील समजलं नाही. तात्यांनी काेणताही आधार नसताना वक्तव्य केली. माझा मूलगा दारु पिताे असेही त्यांनी नमूद केले. बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) यांचा बाेलवता धनी काेणीतरी वेगळा असावा मला वाटत आहे असे साता-याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी नमूद केले.

बाळासाहेब पाटील म्हणाले आम्ही कराडचे आहाेत ते देखील कराडचे (karad) आहेत. बंडातात्या यांनी माझ्यावर मुलावर केवळ प्रसिद्धीसाठी वक्तव्य केल्याचं दिसतं. माझ्या मुलाने त्यांच्यावर मानाहानीचा खटला दाखल करण्यासाठी वकीलांची भेट घेतली आहे. आम्ही त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार आहाेत. (balasaheb patil latest marathi news)

दरम्यान आज (शुक्रवार) बंडातात्या कराडकर (banda tatya karadkar marathi news) यांनी त्यांनी गुरुवारी वाईन विक्रीच्या निर्णया विराेधात केलेल्या वक्तव्यांबद्दल माफी मागितली आहे. यावेळी त्यांनी आमदार बाळासाहेब पाटील आणि माझे दृढ संबंध असल्याचे नमूद केले. दरम्यान बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar latest news) यांनी कराडच्या मठाचा प्रश्न साेडवून दाखवावा असे आव्हान पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी तात्यांना दिलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुरतमध्ये भीषण अपघात, दोन बस समोरासमोर धडकल्या; धडकेनंतर बसने घेतला पेट, ८ जणांचा जागीच मृत्यू

Best Exercises: डॉक्टरांनी सुचवले डायबेटीस, BP आणि हार्ट पेशंटसाठी 5 सर्वोत्तम व्यायाम

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; मुरूम-तुगाव परिसर झोडपला

भाजप आमदाराचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Guru Pushya Yog 2026: तीन राशींचं आयुष्य पलटणार; प्रेम असो की नोकरी, प्रत्येक ठिकाणी नशीब देईल साथ

SCROLL FOR NEXT