Sambhaji Bhide, Solapur, bahujan samaj party Saam tv
महाराष्ट्र

Sambhaji Bhide News : हा तर सरकारचा डावा, आधी भगतसिंह कोश्यारी आता संभाजी भिडे; 'बसपा'चा सरकारला इशारा (पाहा व्हिडिओ)

bahujan samaj party : बसपाने आज साेलापूरात संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध नाेंदविला.

विश्वभूषण लिमये

Sambhaji Bhide News : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडेंना सात दिवसांत अटक करा, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा बहुजन समाज पार्टीने राज्य सरकारला दिला आहे. प्रशांत लोकरे (प्रदेश महासचिव, बसपा) यांनी साम टीव्हीशी बाेलताना भिडे यांच्यावर टीका केली. (Maharashtra News)

महात्मा फुले यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरोधात सोलापुरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. प्रदेश महासचिव अप्पासाहेब लोकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

देशात अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. केंद्र आणि राज्य सरकार या मुद्द्याला बगल देत असून मूळ मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी संभाजी भिडे आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सारख्या लोकांचा वापर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे असा आरोप यावेळी बसपाकडून करण्यात आला.

दरम्यान येत्या 7 दिवसात संभाजी भिडे (sambhaji bhide) यांना अटक करावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा लाेकरे यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha reservation : मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'या' प्रलंबित मागण्यांवर मोहर; त्वरित मिळणार लाभ

Wednesday Horoscope : गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, वाणीवर लक्ष असू द्या; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : खात्यात इतक्या रूपयांचा हप्ता आला की नाही? लाडक्या बहिणींसाठी मोठे सरप्राईज; आताच बॅलेन्स करा चेक

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

SCROLL FOR NEXT