Badlapur News Saam tv
महाराष्ट्र

Badlapur : बदलापूरमध्ये रिक्षाचालकांकडून ५ रुपयांची भाडेवाढ; आरटीओने मात्र भाडेवाढ ठरविली बेकायदेशीर

Auto Rickshaw Fare Hike in Badlapur: शहरी भागात ऑटो रिक्षा प्रवाशी वाहतूक करण्यासाठी चालत असतात. काही रिक्षा चालकांकडून नियमानुसार भाडे आकारणी करत प्रवाशांना सोडले जाते तर काही रिक्षा चालक हे मनमानी पद्धतीने भाडे घेतात

Rajesh Sonwane

मयुरेश कडव 
बदलापूर
: बदलापूर शहरातील रिक्षा चालकांनी अचानकपणे ५ रुपयांची भाडेवाढ केली आहे. रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांकडून जास्तीचे भाडे घेतले जात असल्याने नाहक जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. मात्र ही भाडेवाढ बेकायदेशीर असल्याचं स्पष्टीकरण आरटीओने दिले असून कुणीही जास्त भाडं मागितल्यास थेट आरटीओकडे तक्रार करण्याचं आवाहनही आरटीओकडून करण्यात आले आहे.

शहरी भागात ऑटो रिक्षा प्रवाशी वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालत असतात. काही रिक्षा चालकांकडून नियमानुसार भाडे आकारणी करत प्रवाशांना सोडले जात असते. तर काही रिक्षा चालक हे मनमानी पद्धतीने भाडे घेतात. रात्रीच्या वेळी अधिकचे भाडे आकारणी केयी जात असते. दरम्यान बदलापूर शहरात शेअर रिक्षाचं किमान भाडे हे आतापर्यंत १५ रुपये होतं. आता यात पाच रुपयांची वाढ करून थेट २० रुपये करण्यात आले आहे. रिक्षा चालकांनी केलेल्या भाडेवाढी संदर्भात आरटीओकडे तक्रार गेल्या आहेत. 

आरटीओकडून भाडेवाढीची पडताळणी 

मुळात इंधन दरात अशात कोणत्याही प्रकरणी वाढ झाली नसतांना रिक्षा चालकांनी घेतलेल्या निर्णयाबाबत भाडेवाढीबाबतच्या तक्रारी आल्यानंतर आरटीओने बदलापूरमध्ये पडताळणी केली असता, रिक्षाचालकांनी मनमानी भाडेवाढ केल्याचे समोर आले आहे. याबाबत कल्याण आरटीओने रिक्षा संघटनांना स्पष्टीकरण मागितलं असून पेट्रोल किंवा सीएनजीचे दर वाढलेले नसतानाही भाडेवाढ का केली? याचं उत्तर देण्यास सांगितलं आहे. 

तक्रार करण्याचे आरटीओकडून आवाहन 

दुसरीकडे रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून जास्त भाडं मागितल्यास त्या रिक्षाचालकाचं नाव आणि रिक्षाचा नंबर यासह आरटीओ कार्यालयाच्या व्हॉट्सऍप नंबरवर तक्रार करण्याचं आवाहन आरटीओ अधिकारी निलेश अहिरे यांनी केले आहे. अशा रिक्षा चालकांवर आरटीओकडून कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT