Badlapur Firing update : Saam tv
महाराष्ट्र

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Badlapur Firing update : बदलापूर गोळीबार प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात असल्याचा आरोप जखमीने केलाय.

Mayuresh Kadav

बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. बदलापूरच्या गोळीबारात शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात असल्याचा आरोप जखमी अल्ताफ शेखने केला आहे. या शिवसेना पदाधिकाऱ्याने गोळीबाराचा कट रचल्याचं अल्ताफ शेखने म्हटलं आहे. जखमी अल्ताफ शेखच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जगदीश कुडेकर असे शिवसेना पदाधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या पदाधिकारी जगदीश कुडेकर यांचा हात असल्याचा आरोप जखमी अल्ताफने केला आहे. तसेच जगदीश कुडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून मला न्याय मिळवून देण्याची मागणी अल्ताफने केली आहे.

अल्ताफ शेखने काय म्हटलं?

अल्ताफ शेख म्हटलं की, गोळीबार होण्याआधी शनिवार आणि मंगळवारी दोन वेळा माझं दुकान जाळण्यात आलं होतं, यानंतर जगदीश कुडेकरने मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत मी पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही. अखेर माझ्यावर जगदीश कुडेकरच्या माणसांनी गोळीबार केला.

याप्रकरणी जगदीश कुडेकर याच्यावर गुन्हा दाखल करून मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अल्ताफ शेखने केली आहे. याबाबत जगदीश कुडेकर यांनी मात्र अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आमदारांच्या बंगल्यासमोर झाला होता गोळीबार

बदलापुरातील किसन कथोरे यांच्या बंगल्यासमोर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अल्ताफ शेखवर चौघांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. बदलापूर गावातील आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला होता. जखमी अल्ताफवर दोन गुन्हे गुन्हे दाखल आहेत. तर आरोपीवर तीन गुन्हे आहेत. बदलापूर गावाकडून बोराडपाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गोळीबार झाला होता. गोळीबारानंतर अल्ताफला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT