Badlapur SaamTv
महाराष्ट्र

Badlapur News : बदलापुरातील 'ती' शाळाच निघाली अवैध, शिक्षण विभागाची शाळेला परवानगी नाहीच

Badlapur Abuse Minor Girl : शाळेचे मुख्याध्यापक, ट्रस्टी यांची त्यांनी चौकशी केली. यावेळी शाळेच्या परवानगी संदर्भात कागदपत्र तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली.

Prashant Patil

ठाणे (बदलापूर) : बदलापुरातील एका खासगी शाळेत शिक्षकानेच सातवीच्या विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण संवेदनशील असल्याने महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य नीलिमा चव्हाण आणि महिला बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी आज शाळेला भेट देत सर्व घटनेची चौकशी केली.

शाळेचे मुख्याध्यापक, ट्रस्टी यांची त्यांनी चौकशी केली. यावेळी शाळेच्या परवानगी संदर्भात कागदपत्र तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली. ज्या शाळेत सातवीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाला त्या शाळेच्या वर्गांना शिक्षण विभागाची परवानगी न घेता ते अनधिकृतपणे चालवले जात असल्याचं वास्तव समोर आलंय. शाळेला फक्त पहिलीपर्यंत शिक्षण विभागाची मान्यता असल्याचं महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोग सदस्य नीलिमा चव्हाण यांनी सांगितलंय.

नेमकं प्रकरण काय?

बदलापूरमधील एका खासगी शाळेमध्ये विद्यार्थीनीसोबत ३ वर्ष विनयभंग करत होता, अशी तक्रार पीडितेच्या आईने पोलिसांकडे नोंदवली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. आरोपी शिक्षक पीडित मुलीला तिच्या आईवरुन अश्लील टिप्पणी करत होता. पीडित मुलगी मानसिक तणावाखाली असल्याने ती अचानक आजारी पडली, रुग्ण्यालयात घेऊ गेले असता, हा घडलेला सर्व प्रकार समोर आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT