Bacchu Kadu - Vijay Vadettiwar Saam Tv
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar on Bacchu Kadu : बच्चू कडू भविष्यात महाविकास आघाडीसोबत येतील, विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

Political News : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News : आमदार बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही महिन्यापासून सुरु आहे. त्यातच आता बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज आंदोलन केलं. यावरुन बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. याच मुद्द्यावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

बच्चू कडू यांचा या सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्यांना सत्य कळले आहे. त्यामुळे बच्चू कडू भविष्यात महाविकास आघाडीसोबत येतील, असा दावा विजय वडेट्टीवर यांनी केला आहे. (Latest Marathi News)

बच्चू कडूंचं आंदोलन

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला. या मोर्चात बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मी सरकारमध्ये आहे तर घरी बसू का? मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल नाही की मोर्चे काढू नका. शेतकऱ्यांच्या छोट्या छोट्या मागण्यांसाठी आम्हाला सरकार पुढे हात पसरवावे लागत आहेत. (Political News)

शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटू व यात मागण्या पूर्ण न झाल्यास ३ महिन्याचा अवधी सरकारला देऊ. यातूनही मार्ग न निघाल्यास आगामी हिवाळी अधिवेशनात विशाल मोर्चा काढू, असा इशारा सरकारला दिला. तीन महिन्यांत पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू. सरकारवर दबाब निर्माण करण्यासाठी हा मोर्चा नाही, असंही बच्चू कडू स्पष्ट केलं. (Breaking Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका रद्द, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT