Bacchu kadu  Saam Tv
महाराष्ट्र

Bacchu Kadu News : 'या' खात्याचे मंत्रिपद मिळाल्यास आनंद हाेईल : बच्चू कडू

दिव्यांगांचा स्वप्न अखेर पूर्ण झाल्याचे बच्चू कडू यांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Bacchu Kadu News : दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी प्रहारचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू मागील अनेक वर्षांपासून करत होते. त्यांची ही मागणी अखेर शिंदे-फडणवीस सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे आज अमरावतीच्या (amravati) संत गाडगेबाबा मंदिरात आमदार बच्चू कडू यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी करत व ढोल ताशांचा गजर करत जल्लोष केला. (Amravati Latest Marathi News)

यावेळी दिव्यांगांनी आनंद व्यक्त करीत लाडू वाटप केले. आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून भन्नाट डान्स (dance) केला. यावेळी दिव्यांग मंत्रालयाचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर अधिक आनंद होईल अशी भावना आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

यावेळी बच्चू कडू म्हणाले शिंदे -फडणवीस सरकारचा हा क्रांतिकारी निर्णय आहे. दिव्यांगांचा एक स्वप्न होतं ते स्वप्न अखेर पूर्ण झाले. यासाठी मी अनेक आंदोलने केली. त्यासाठी गुन्हे झेलले. त्यामुळे दिव्यांग मंत्रालयाचा आनंद आमच्यासाठी मोठा आहे असेही बच्चू कडू (bacchu kadu) यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोलता बोलता अचनाक थांबले अन् स्टेजपासून दूर गेले; भाषणावेळी अमित ठाकरेंसोबत नेमकं काय घडलं?

Abhijeet Dipke Announcement: अभिजीत दीपके राजकारणात येणार? निवडणुकीसंदर्भात केली मोठी घोषणा

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी, संसद आवारात अवतरले मंदिरातले 'साधू', लोकसभा अध्यक्षांचा आंदोलनाला आक्षेप

दिल्लीत जंतरमंतरला अभेद्य तटबंदी, सुरक्षेसाठी 8 फूट उंच बॅरिकेड्स, भविष्यातील आंदोलनांवर नियंत्रणाची रणनीती?

पंतप्रधान मोदींची विद्यार्थ्यांना माफी, पोलीस आंदोलकांवरील गुन्हे कधी मागे घेणार?

SCROLL FOR NEXT