Bachchu Kadu
Bachchu Kadu Saam tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu on Sanjay Raut : बच्चू कडूंचा नाराजीच्या चर्चांवर खुलासा; अयोध्या दौऱ्याला न जाण्याचं सांगितलं कारण

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार, खासदार आणि पदाधिकारी दोन दिवसांपूर्वी आयोध्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याला शिंदे गटातील काही नेते उपस्थित नव्हते. ते नाराज असून लवकरच हे सरकार कोसळणार अशी ठिका ठाकरे गटाकडून केली जात आहे. यासह बच्चू कडू यांच्या अयोध्येतील अनुपस्थितीवरून संजय राऊतांनी निशाणा साधला होता. त्यावर बच्चू कडू यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. (Political News)

शिंदे गटातील अनेक नेत्यांनी वेगवेगळी कारणे देत आयोध्या दौरा नाकारला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील एक गट अस्वस्थ आहे, असं खासरदार संजय राऊतांनी म्हटलं होतं. त्यामुळे यावर अयोध्या दौऱ्याला न गेलेल्या नेत्यांनी माध्यमांसमोर येत आपली विविध कारणे सांगितली आहेत.

अशात यावर प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या आमच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने त्या कामात व्यस्त होतो, त्यामुळे अयोध्या दौऱ्यावर जाऊ शकलो नाही अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. याशिवाय बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

थोड्यासाठी नाराजी ओढावून घ्यायची नाही

बच्चू कडू यावेळी म्हणाले की, आमच्या सरकारचा कार्यकाळ हा ७ ते ८ महिन्यांपर्यंतचा उरला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार करून नाराजी ओढावून घेण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा सध्या जैसे थे तसंच ठिक आहे. शिंदे फडणवीस सरकारने भरभरून निधी दिला आहे. लोकांना पदापेक्षा काम करणं महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे आम्ही काम करत आहोत, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : 'दक्षिण भारतात भाजपच्या १० जागाही येणार नाहीत'; आदित्य ठाकरेंचा भाजप, शिंदे गटावर हल्लाबोल

Mumbai Local Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Maharashtra Politics 2024 : भुजबळ नाराज, महायुतीला टेंशन?; महाजनांची भुजबळ फार्मवर दीड तास चर्चा

Health Tips: वजन कमी करण्यासाठी भोपळ्याचे करा अशापद्धतीने सेवन, दिसेल लवकर रिझल्ट

Lok Sabha Election: 'मोदी-राज' सभेनंतर उद्धव ठाकरे सुपरफास्ट, मुंबईत एकाच दिवशी 4 सभांचा धडाका

SCROLL FOR NEXT