cm Eknath shinde, deputy cm devendra fadnavis, mla bacchu kadu saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Expansion: शिंदे- फडणवीस शब्द पाळतील! 'या' आमदाराला मंत्रिपदाचा विश्वास; मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीखही सांगून टाकली (पाहा व्हिडिओ)

मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारिख सांगून टाकली पाहा व्हिडिओ

Siddharth Latkar

- अमर घटारे

Bacchu Kadu News : सर्वाेच्च न्यायालयात गुरुवारी सत्तासंघर्षाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकाराचा जीव भांड्यात पडला. हा निकाल लागल्यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ (Maharashtra Mantrimandal Vistar) हाेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला तर काेणा काेणाला मंत्रिपद मिळेल याची चर्चा समाज माध्यमातून देखील सुरु आहे. (Maharashtra News)

दरम्यान शिंदे- फडणवीस सरकारला पाठींबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू (mla bacchu Kadu) यांनी सर्वाेच्च न्यायालयातील निकालाबाबत बाेलताना काही गोष्टी सोडल्या तर निकाल हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या बाजूने लागलेला आहे. हा अपेक्षेप्रमाणे निकाल लागला असून याचा आनंद होत आहे असे म्हटलं.

यावेळी बच्चू कडू म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी अभिनंदन केले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु आहे या प्रश्नावर हाे 20 ,21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं माझ्या कानावर आलं आहे असे बच्चू कडूंनी म्हटलं. दरम्यान 20, 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार नाही झाला तर 2024 नंतरच होईल असेही कडू यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो शब्द दिला तो ते पार पडातील आणि दिव्यांग नवीन मंत्रालयाला गतिमान करण्याचा आम्ही प्रयत्न करू असा विश्वास कडू यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला. मंत्रिमंडळ विस्तार हा एकट्यासाठी नसून जनतेसाठी महत्त्वाचा आहे असेही कडू यांनी नमूद केले.

संजय राऊतांवर टीका

संजय राऊत हे सकाळी कोंबड बोंबलत तसेच रोज बोलतात. सकाळी उठल्यावर त्यांना काही ना काही बोलावं लागतं, त्याशिवाय त्यांची बातमी होत नाही. ते सरकार तीन महिन्यांनी पडेल, एक वर्षाने पडेल असे म्हणत हाेते. त्यामुळे संजय राऊत यांच्या बोलण्याला कोणीच गांभीर्याने घेत नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : भारत बंद असतानाच सोनं झालं स्वस्त, प्रतितोळा इतकी किंमत, वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

Udit Narayan : "जबरदस्ती गर्भाशय काढलं अन्..."; सुप्रसिद्ध गायकाच्या पहिल्या पत्नीचे गंभीर आरोप, FIR दाखल

Maharashtra Live News Update: पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक

Ishan Kishan: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, अभिषेकनंतर इशान किशनही जखमी; प्लेईंग ११ मध्ये कोण खेळणार?

New Labour Law: ४८ तास काम अन् ३ दिवस भरपगारी सुट्टी; कामगार संहितेत बदल; राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT