bacchu kadu & raj thackeray saam tv
महाराष्ट्र

असा सुटला असता भाेंग्याचा प्रश्न, राज ठाकरेंची इच्छाच नाहीये : बच्चू कडू

आपल्या सर्वांच्या डोक्यात एकच असले पाहिजे ते म्हणजे तिरंगा असेही कडू यांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांना राज्यात आणि देशात दंगली घडवायच्या आहेत की काय असा प्रश्न उपस्थित हाेत असल्याचे मत राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांनी उपस्थित केला आहे. रविवारी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी भाेंगे काढण्यावरुन एकादाचे हाेऊन जाऊ द्या असं म्हटले आहे. त्यामुळे देशातील आणि राज्यातील सामाजिक स्थिती बिघडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे असेही कडू यांनी नमूद केले. (raj thackeray latest marathi news)

राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले सध्या देश आणि राज्य आर्थिक संकटात आहे. आता राज्यात आणि देशात दंगली परवडण्यासारखे नाहीत. मशिदीच्या समोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्याचा नेमका उद्देश काय. एकीकडे चाकू मारायचा आणि माझा उद्देश खून करायचा नव्हता, रक्त काढायचा नव्हता असं बोलायचे. यापेक्षा राज ठाकरेंनी सर्व धर्मगुरूंची बैठक घेऊन जातीय सलोखा केला असता तर त्यांना लोकांनी डोक्यावर घेतले असते. भाेंग्याचा (loudspeaker) प्रश्न देखील सुटला असता परंतु राज ठाकरेंना असे करायचे नाहीये असे कडू यांनी नमूद केले.

दरम्यान ज्याला त्याला त्याचा धर्म प्रिय असताे आणि असला पाहिजे. पण धर्मावरून वाद निर्माण होईल अशी धार्मिकता असेल तर ती देशाला घातक ठरेल. झेंडा लावला तर मत मिळत असेल तर काम करण्याची गरज नाही. रंगाचा, झेंडाचे व भाषेचे राजकारण करायचे व सत्ता मिळवायची हा भामटेपणा लोकांनी हाणून पाडलं पाहिजे. आपल्या सर्वांच्या डोक्यात एकच असले पाहिजे ते म्हणजे तिरंगा असेही कडू यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पोलिसाच्या समोरून घेऊन गेला चोरटा दुचाकी, घटना सीसीटीव्हीत कैद

Cabinet Expansion : फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 'या' मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात खळबळबळ

रात्री कोणत्या दिशेला डोके करून झोपावे?| Sleeping Position

Skin care: चेहऱ्यावर नॅचरल पिंक ग्लो पाहिजे? मग 'हा' फेसपॅक आठवड्यातून २ वेळा नक्की लावा

गॅस कनेक्शन नसताना ही मिळणार LPG सिलिंडर; 10 मिनिटांत होम डिलिव्हरी, अशी करा बुकिंग

SCROLL FOR NEXT