महाराष्ट्र

Political News : घोलप पिता-पुत्रांनी उद्धव ठाकरे-अजित पवारांचं टेन्शन वाढवलं; पडद्यामागे नेमकं काय चाललंय?

Nashik Political News : बबनराव घोलप यांनी वंचित बहुचन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News :

शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन नाराज असल्याची चर्चा आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेनेतील एन्ट्रीमुळे त्यांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे जर वाकचौरे यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली तर काय? या पर्यायांचा चाचपणी बबनराव घोलप यांनी सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

बबनराव घोलप यांनी वंचित बहुचन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे नाराज बबनराव घोलप वेगळ वाट धरतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे बबनराव घोल यांचे सुपूत्र योगेश घोलप यांनी देखील राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. (Latest Marathi News)

योगेश घोलप शरद पवार यांची भेट घेतल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विद्यमान आमदार सरोज अहिरे यांचं देखील टेन्शन वाढलं आहे. योगेश घोलप देवळाली मतदासरांघाचे माजी आमदार आहेत.(Political News)

राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवारांना या मतदारसंघात आपल वर्चस्व टिकवण्याचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार योगेश घोलप यांची भेट महत्त्वाची आहे.

योगेश घोलप पुन्हा राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार गटाकडून सरोज अहिरे यांना पर्याय म्हणून योगेश घोलप यांचा विचार होण्याची शक्यता आहे.

Edited By- Pravin Wakchoure

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT