auto rickshaw strike begins in kolhapur sanghatana criticizes cm eknath shinde Saam Digital
महाराष्ट्र

रिक्षा, टॅक्सी संपास प्रारंभ; मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात येणं टाळलं, संघटनेने सांगितलं कारण (पाहा व्हिडिओ)

auto rickshaw strike begins in kolhapur sanghatana criticizes cm eknath shinde : आज मध्यरात्रीपासून कोल्हापुरात रिक्षा चालकांनी सोळा तासांसाचे रिक्षा बंद आंदोलन पुकारले आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगांवकर

मुख्यमंत्री हे स्वत: रिक्षा चालक हाेते. आम्हांला आशा हाेती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमची मागणी पूर्ण करतील परंतु कदाचित त्यांनी आमची धास्ती घेतल्याने त्यांचा काेल्हापूर रद्द झाला आहे अशी भावना काेल्हापूर येथील रिक्षा व्यावसायिकांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली. दरम्यान आज (मंगळवार) 16 हजार रिक्षा व्यावसायिकांनी रिक्षा बंद ठेवून पासिंगबाबतच्या दंड आकारणीच्या निर्णयाचा निषेध नाेंदविला.

कोल्हापूर जिल्ह्यातील 16 हजार रिक्षा संपावर गेल्या आहेत. रिक्षा सोबतच टॅक्सी आणि ट्रॅव्हल्स देखील संपात उतरल्या आहे. पासिंग दंडामध्ये प्रतिदिन 50 रुपये आकारण्याच्या विरोधात कोल्हापुरात वाहन चालकांनी हा संप पुकारला आहे.

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व रिक्षा बंद असल्यामुळे कोल्हापूर शहरात कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. त्यांना पर्याय म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या केएमटी बसचा आधार घ्यावा लागत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT