Auto drivers seen refusing passengers despite empty vehicles during peak hours in Mumbai suburbs. saam tv
महाराष्ट्र

रिक्षाचालकांची मुजोरी कॅमेऱ्यात कैद!रिक्षाचालकांचा माज कोण उतरवणार?

Auto Drivers Refuse Short Distance Rides In Mumbai: रिक्षा चालक प्रवाशांवर कसा माज दाखवतात... या रिक्षा चालकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे प्रवासी कसे हैराण झालेत..पाहूयात त्यावरचा साम टीव्हीचा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट....

Snehil Shivaji

एका खांद्यावर झोपलेली चिमुरडी तर दुसऱ्या हातात बॅगा...घरी जाण्यासाठी एक बाप रिक्षाला हात करत होता...समोरून रिकाम्या रिक्षा जात होत्या..१०० च्या वर रिक्षांना हात दाखवला.... पण एकही रिक्षा थांबली नाही... पण ही काही एकच घटना नाही. मुजोर रिक्षाचालकांचा राजरोसपणे प्रवाश्यांना छळण्याचा उद्योग कसा सुरु आहे..यासाठी साम टिव्हीनं मुंबईपासून थेट डोबिंवली- विरार पर्यंत जाऊन रिक्षावाल्याचा हा मुजोरपणा समोर आणला.

पाहिलंत, हे तेच रिक्षावाले आहेत जे तुमच्यासमोर उद्दामपणे वागतात.. या रिक्षावाल्यांना ना कोणाची भिती ना कायद्याचा धाक. सगळा मनमर्जी कारभार. अव्वाच्या सव्वा भाडं आकारणं, जवळचं भाडं नाकारणं.. हे सगळं कायद्याच्या राज्यात खुलेआम सुरुये कधी काळी रिक्षाचालक असलेल्या आणि आता परिवहन मंत्री असलेल्या प्रताप सरनाईकांना याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केल्यानं सरनाईकांनी नेहमी प्रमाणे काय प्रतिक्रीया दिली ते पाहा

प्रवाशांच्या जीवावर जगणाऱ्या या रिक्षाचालकांचा माज कमी होत नाहीये, हे साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशनमधून समोर आलंय... याचं प्रशासनाला याचं काहीच सोयरं सुतक नाहीये. कारण आता पर्यंत किती रिक्षाचालकांवर काय कारवाई केली किती दंड वसूल केला याची अद्याप आकडेवारी कधी समोर आली नाही.... त्यामुळे नायक चित्रपटातील अनिल कपूर बनून बसडेपो रॅपिडो वाल्यांची पाहणी करण्याऐवजी राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी आता मराठी सक्तीची करण्याआधी या माजुरड्या रिक्षाचालकांवर काय कारवाई करणार या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला देणं गरजेचंये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT