Akola BJP News Saam Tv
महाराष्ट्र

Akola BJP News: अकोल्यात ऑटो चालकाचा भाजप आमदारांना लुटण्याचा प्रयत्न, पोलिसात तक्रार

या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

अॅड. जयेश गावंडे

Akola News Today: अकोल्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे अकोल्यातील विधान परिषद आमदार वसंत खंडेलवाल यांना लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना रात्री 10.05 वाजता गोरक्षण मार्गावरील खंडेलवाल भवनसमोर घडली आहे. आमदार वसंत खंडेलवाल हे अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. (Latest Marathi News)

एका ऑटोचालकाने खंडेलवाल यांच्याशी हुज्जत घालत त्यांचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. आमदार खंडेलवाल हे रात्री गांधी रोडवरील आपल्या सोन्याच्या दुकानातून काम आटोपून आपल्या निवासस्थानी जात होते.

घरी परतीच्या मार्गावर असताना अगदी घराजवळ रस्त्याच्या मधोमध एक रिक्षा उभी होती. गाडीचा हॉर्न वाजवूनही ऑटोचालकाने ऑटो बाजूला केला नाही म्हणून खंडेलवाल हे खाली उतरले, त्याला याबाबत विचारणा केली असता ऑटोचालकाने हुज्जत घातली. त्यानंतर आमदारांनी रिक्षाचे फोटो काढायला सुरुवात केली, त्यावेळी चक्क रिक्षावाल्याने त्यांच्याकडून मोबाइल हिसकावून घेतला. (Akola News)

ऑटोचालकासोबत आणखी दोन लोक असल्याची माहिती आमदार वसंत खंडेलवाल यांनी सांगितले. खंडेलवाल गांधी रोडवरील आपल्या सराफा दुकानातून खंडेलवाल भवनामागील आपल्या घरी सोने खरेदी-विक्रीची रक्कम घरी घेऊन जात असताना हा प्रकार घडला आहे. 

हा वाद स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास पडला. लागलीच स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी केली आणि रिक्षाचालकाला समजावलं. आपण वाद घालत असलेला समोरील व्यक्ती आमदार असल्याचे रिक्षाचालकाला समजले. या दरम्यान ऑटोचालकाच्या हातातून मोबाइल (Mobile) खाली पडला आणि आमदार मोबाइल उचले पर्यंत ऑटोचालक तिथून फरार झाला होता.

या संदर्भात खंडेलवाल यांना विचारणा केली असता शहरात गेल्याच आठवड्यात घडलेल्या हिंसाचारा नंतर असा प्रकार होणे धक्कादायक असल्याचे ते म्हणाले. दरम्यान आमदार वसंत खंडेलवालांनी याप्रकरणी खदान पोलिसात (Police)तक्रार दाखल केली आहे. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमधील गराडे धरण 100 टक्के भरले

Thursday Horoscope: नात्यात गोडवा वाढेल; ५ राशींच्या व्यक्तींनी खर्च जपून करा; वाचा आजचे राशीभविष्य

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! उंदीर आणि माशांचा वावर दिसताच प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द

Motichoor Laddu Recipe: सण किंवा कार्यक्रमासाठी, घरच्या घरी बनवा हलवाईसारखे मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू

SCROLL FOR NEXT