Bribe saam tv
महाराष्ट्र

औसा : तीन हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदारास रंगेहाथ अटक!

औसा पोलिसात भादंवि 294, 323, 506 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात तडजोडीसाठी पाच हजारांची मागणी!

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराने एका प्रकरणात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली. या सौद्यातील तीन हजार रुपये स्वीकारताना या हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून, सदर पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा :

या संदर्भात अधिक माहिती अशी की, औसा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राजेंद्र गोरख लामतुरे यांनी एका प्रकरणात तक्रारदार यांना मदत करतो म्हणून पाच हजारांची मागणी केली. त्यातील तीन हजार रुपये स्वीकारताना लामतुरे यांना अटक करण्यात आली आहे. औसा पोलिसात भादंवि 294, 323, 506 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस हवालदार लामतुरे यांनी तक्रारदारास पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती पहिला हप्ता 3 हजार व दुसरा हप्ता 2 हजार अशी लाच मागितली.

शुक्रवारी पाच वाजण्याच्या सुमारास लामतुरे यांनी तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने ही कारवाई केली आहे. पुढील तपास अन्वर मुजावर करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Peels Benefits For Skin : त्वचेवर केळीची साल लावा, डार्क सर्कल होतील गायब आणि चेहरा दिसेल काचेसारखा

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ नव्हे, तर बॉलिवूडचा 'हा' सुपरस्टार होता हल्लेखोरांच्या निशाण्यावर? घराजवळ केली ३ वेळा रेकी

Maharashtra News Live Update: नागपूर विमानतळावर महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानाची नागरिकांना मारहाण

Audio Clip : काँग्रेस आमदाराच्या भावांची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपांनंतर अखेर गुन्हा दाखल

Maharashtra Fort : गर्दीपासून दूर, इतिहासाच्या जवळ; महाराष्ट्रातील 'या' ७ गड-किल्ल्यावरून तुमची नजर हटणारच नाही

SCROLL FOR NEXT