सासरवाडीतून जेवण करून 'तो' घरी निघाला, मात्र रस्त्यातच काळाने घाला घातला SaamTvNews
महाराष्ट्र

सासरवाडीतून जेवण करून 'तो' घरी निघाला, मात्र रस्त्यातच काळाने घाला घातला

सकाळी त्यांचा मेहुणा कामावर जात असताना झेंडा चौक येथे सिमेंटच्या रस्त्यावर रवींद्र मगरे हे मृत अवस्थेत दिसून आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अविनाश कानडजे

औरंगाबाद : आपल्या सासरवाडी मधून जेवण झाल्यावर घरी जातोय म्हणून सांगून गेलेला जावई घरी पोहोचलाच नाही. रात्री जेवण करून घराकडे जाणार्‍या जावयाचा अपघातामध्ये (Accident) मृत्यू झाल्याची घटना शहरातील झेंडा चौक येथे घडली आहे. रविंद्र किशोर मगरे असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मगरे यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, मयत रवींद्र मगरे हे त्यांच्या पत्नी सोबत त्यांची सासुरवाडी राजनगर येथे गेले होते.

हे देखील पहा :

रात्री त्यांनी मेव्हण्यासोबत सोबत दारू दारू पिऊन जेवण केले. त्यानंतर मी माझ्या घरी जातो म्हणून सांगून तिथून निघाले, मात्र ते त्यांच्या घरी पोहोचलेच नाही. आज सकाळी त्यांचा मेहुणा कामावर जात असताना झेंडा चौक येथे सिमेंटच्या रस्त्यावर रवींद्र मगरे हे मृत (Death) अवस्थेत दिसून आले. त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला असून, त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव चालू होता. त्याच अवस्थेत मुकुंदवाडी (Mukundwadi) पोलिसांनी (Police) त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळेस घाटीतील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, त्यांचा अपघात झालेल्या ठिकाणी दररोज रात्री राठोड हा पाटील ट्रान्सपोर्टची बस उभी करत असतो. गणेश राठोड याने तीच बस निष्काळजीपणाने चालून माझ्या भावास धडक देऊन त्याला गंभीर जखमी केले आणि अपघाताची माहिती न देता तिथून पळून गेला. अशा आशयाची तक्रार मृत मगरे यांच्या भावाने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बस आणि गणेश राठोड याला ताब्यात घेतले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

वजन कमी करण्यासाठी प्या मेथी आणि सब्जाचे पाणी, १५ दिवसांत कमी होईल पोटावरची वाढलेली चरबी

Solapur: सोलापूर हादरले! पहाटे ट्रेनवर थरारक दरोडा, प्रवाशांना मारहाण; महिलांनाही सोडलं नाही, मोबाईल अन् दागिने लुटले

SCROLL FOR NEXT