औरंगाबाद: मटका अड्ड्यावर छापा; 22 लाखांचा ऐवज जप्त! माधव सावरगावे
महाराष्ट्र

औरंगाबाद: मटका अड्ड्यावर छापा; 22 लाखांचा ऐवज जप्त!

शहरामध्ये लॉटरीचे अड्डे बंद झाल्यानंतर आता पूल टेबल आणि स्नूकरच्या नावाखाली जुगार आणि मटका सुरू असल्याचं समोर आलंय.

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद: शहरामध्ये लॉटरीचे अड्डे बंद झाल्यानंतर आता पूल टेबल आणि स्नूकरच्या नावाखाली जुगार आणि मटका सुरू असल्याचं समोर आलंय. पूल टेबल आणि स्नुकरच्या नावाखाली सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर गुरुवारी रात्री उशिरा औरंगाबाद (Aurangabad) शहर पोलिसांनी कारवाई केलीय.

शहरातील उस्मानपुरा भागांमध्ये पोलिसांनी कारवाई करीत जुगार चालवणाऱ्या दहा जणांवर गुन्हा दाखल करून २२ लाखांचा ऐवज जप्त केलाय. औरंगाबाद शहरात लॉटरी आणि स्किल गेमच्या नावाखाली जुगार, मटका सुरू असल्याची बातमी साम टीव्हीवर दाखवल्यानंतर शहरातील लॉटरीचे अड्डे बंद झाले होते.

लॉटरी दुकान, अड्डे बंद असल्याने आता काही ठिकाणी पूल टेबल, स्नुकरच्या नावाखाली जुगार, मटका सुरू झालाय. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर उस्मानपुरा पोलिसांनी कारवाई केलीय. उस्मानपुऱ्यातील शार्प पूल टेबलच्या ठिकाणी रात्री उशिरा छापा टाकल्यानंतर मुजाहेद मोहम्मद हमीद सिद्दिकी हा स्नुकरच्या नावाखाली तरुणांकडून पैसे घेऊन जुगार खेळताना दिसून आला.

हे देखील पहा-

त्या ठिकाणी पाच पुल टेबल पैकी दोन टेबलवर दहा जण खेळत होते. तर काउंटरवर एक जण आकडे आणि पैशांचा हिशोब ठेवत होता. यावेळी मालक मुजाहेद मोहम्मद यांच्यासह नऊ जणांना अटक करून, गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिलीय. पोलिसांनी स्नूकर खेळण्यासाठी लागणारे साहित्य ज्यात १५ लाकडी स्टिक, वेगवेगळे रंगाचे यांचे ५० गोलाकार चेंडू, रजिस्टर, ११ मोबाईल हँडसेट आनि रोख रक्कम ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT