Aurangabad News Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad News: कृषी मंत्र्यांच्या मतदार संघात शेकऱ्यांच्या आत्महत्या; ३ दिवसात २ तरुणांनी संपवली जीवन यात्रा

साम टिव्ही ब्युरो

Aurangabad News: दुष्काळ आणि नापिकी यासह डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण देखील वाढत आहे. अशात औरंगाबादमधील (Aurangabad) सोयगाव येथे ३ दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे दोन्ही शेतकरी तरुण होते. एवढ्या कमी वयात शेतीत अपयश आल्याने त्यांनी आत्महत्या केली आहे. सदर घटनेने संपूर्ण गावात दु:खाचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे दीपक जनार्दन सुस्ते (वय वर्षे ३२) या शेतकऱ्याने राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली आहे. त्याने विष घेतल्याचे समजताच कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र उपचारादरम्यान काल मध्यरात्री त्याने या जगाचा निरोप घेतला. शेतीत (Farm) हवे तसे पिक येत नसल्याने तो खूप खचून गेला होता. शेतीतल्या अपयशामुळे बरेच दिवस नैराश्यात होता. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

या घटनेच्या ३ दिवस आधीच गावात एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. गोपाळ शेणफळ सोनवणे (वय वर्षे २७) या शेतकर्याने स्वत:च्या शेतात. गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीसाठी त्याने बॅंकेतून कर्ज घेतले होते. मात्र यंदा खरीप पिकाचे उत्पादन खुप कमी झाले. यामुळे त्याच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला होता. याच कर्जापासून सुटका मिळावी म्हणून त्याने गळफास घेतला. अशता सदर गाव हे कृषी मंत्र्यांच्या मतदार संघात येते. मात्र तरी देखील या गावात शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत असल्याने कृषीमंत्र्यांनी स्वत:च्या मतदार संघात आधी लक्ष द्यावे असे शेतकरी म्हणत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी करता येणार हवाई सफर

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT