Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad News: अवैध गर्भपात उघड; पदवी नाही तरी दवाखाना सुरू

अवैध गर्भपात उघड; पदवी नाही तरी दवाखाना सुरू

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चितेगाव येथील (Aurangabad) औरंगाबाद स्त्रीरोग रुग्णालयात (Hospital) बेकायदा गरबा केंद्र चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. धक्‍कादायक बाब म्‍हणजे दवाखाना चालवत असलेल्‍या पुरूष डॉक्‍टराकडे पदवी नसल्‍याचे देखील समोर आले आहे. (Letest Marathi News)

औरंगाबाद जिल्‍ह्यातील अवैध गर्भपात प्रकरणात आता आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. हा दवाखाना आरोग्य यंत्रणा तसेच पोलीस प्रशासनाने सील करून त्या ठिकाणचे संपूर्ण साहित्य जप्त केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली.

दवाखाना चालवण्याचा परवानाही नाही

धक्कादायक बाब म्हणजे त्या दांपत्याकडे ग्रामपंचायतीचा दवाखाना चालवण्याचा परवाना नसल्याचे देखील उघडकीस आले आहे. तसेच महिला डॉक्टरांकडे ‘बीएचएमएस’ची पदवी होती. मात्र, पुरुष डॉक्टराकडे कोणत्याही प्रकारची पदवी नसल्याचेही समोर आले आहे. या दवाखान्याला गर्भपाताची कोणत्याही प्रकारची शासन मान्यता नसल्‍याचा धक्कादायक खुलासा देखील समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नारा नदी पुलाखाली आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

Cucumber Benefits: उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

२ तासांपूर्वी मित्रांसोबत फोटो काढला, स्टेटसला ठेवला; पण त्यांनीच केली हत्या, संभाजीनगरात खळबळ

खिशात पैसा खेळता राहणार, ऑफिसमध्ये प्रमोशन मिळणार; ५ राशींच्या लोकांवर लक्ष्मी प्रसन्न होणार

Kidney Failure Signs: किडनी फेल होण्याचे पहिले लक्षण कोणते?

SCROLL FOR NEXT