Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad News: एकुलता एक मुलगा गेल्याचे दुःख; विरहात आईनेही संपविली जीवनयात्रा

एकुलता एक मुलगा गेल्याचे दुःख; विरहात आईनेही संपविली जीवनयात्रा

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील बिडकिन पोलिस ठाणे हद्दीतील शिवणाई येथील मुलाच्या विरहात आईने (Aurangabad News) राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलगा एकुलता एक होता. त्‍याच्‍या मृत्‍यूमुळे आईने देखील जीवनयात्रा संपविली आहे. (Tajya Batmya)

शिवणाई (ता. पैठण) येथील रितेश काळे याने २ मार्चला आत्महत्या केली होती. मुलाला काही दिवस झाले असतानाच आई रुख्मणबाई रमेश काळे यांनी देखील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पैठण तालुक्यातील शिवनाई येथील अकरावी वर्गात शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय शालेय विद्यार्थी रितेश रमेश काळे विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रितेश काळे आई– वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

बाथरुममध्ये गळफास

रितेशच्या आई रुखमनबाई रमेश काळे यांना आपल्या मुलाचे दुःख सहन न झाल्याने त्यांनी गुरुवारी (२२ मार्च) दुपारी राहत्या घरी बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटनांमुळे शिवनाई व परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केले आहे. रुखमाई काळे यांच्या पश्चात पती, एक मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT