Aurangabad News Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad : राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षावर हल्ला, प्रकृती चिंताजनक; नेमकं काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

डॉ. माधव सावरगावे

Aurangabad News : नाव वर्षाच्या पहिल्याच दिवशी औरंगाबाद येथून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात भाऊसाहेब तरमळे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तरमळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

याप्रकरणी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत नागे, आकाश नागे, अशोक नागे, पांडुरंग नागे, राजु बनकर,दिनेश राठोड, सुनिल खरात, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नाव आहे.

बोकुड जळगाव येथे काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. ज्यात भाऊसाहेब तळमळे यांच्या आईचा विजय झाला. याचच राग मनात ठेवून विरोधी गटातील अनिकेत नागे याने हातातील चाकुने भाऊसाहेब तरमळे यांच्यावर काल (३१ डिसेंबर २०२२) रात्री अचानक हल्ला केला.

भाऊसाहेब यांच्या डोक्यावर, मानेवर चाकुचा मार लागला आहे. या हल्ल्यात भाऊसाहेब गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उचार सुरु आहे. मात्र मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळतच बिडकीन पोलीस ठाण्यातील पथकाने गावात धाव घेतली. त्यानंतर जखमी तरमळे यांना रुग्णालयात हलवण्यात आले. गावात झालेल्या वादानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळेत पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

Maharashtra Live News Update: हडपसर ते दिवेघाट रस्ता राहणार बंद

अमरावतीच्या मेळघाटात पिकअप ५० फूट दरीत कोसळला; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT